जामखेड न्युज——
जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी दिलीप गुगळे यांची निवड
जामखेड जैन श्रावक संघाच्या निवडणुकीत बाफना गुगळे यांच्या परिवर्तन पँनलला बहुमत मिळाले होते यानुसार आज कार्यकारीणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना तर सेक्रेटरी पदी शरद शिंगवी यांची निवड झाली आहे. अनेक वर्षे कोठारी गटाची सत्ता होती. आता परिवर्तन झाले आहे. नुतन पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
जामखेड येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या संस्थेच्या १३ जागांसाठी दि. २९ रोजी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आठ जागा तर अरिहंत पॅनल तीन जागा व दोन जागांवर अपक्षांना विजय मिळाला. जैन समाजाच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक घेण्यात आली.
या निवडणूकीत एकुण तेरा जागेसाठी तीस उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एकुण ८२३ मतदारांपैकी ७१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये दोन गट पाडण्यात आले होते. गेले पंचवीस वर्षे कोठारी यांच्या ताब्यात सत्ता होती. याच सत्तेला सुरूंग लावला होता.
गुगळे बाफना यांनी तरुणांना एकत्रित करून परिवर्तन पॅनल स्थापन करत आठ जागा जिंकल्या तर सत्ताधारी कोठारी यांच्या अरिहंत पॅनलला तीन जागा मिळाल्या दोन जागेवर अपक्षांनी बाजी मारली होती. आज पदाधिकारी निवड पार पडली यानुसार अध्यक्षपदी दिलीप गुगळे, उपाध्यक्षपदी महावीर बाफना तर सेक्रेटरीपदी शरद शिंगवी यांची निवड झाली आहे.
यापैकी अ गटातून पाच उमेदवार निवडून द्यायचे होते. या गटातील तेरा मते बाद झाली. तर ब गटातील चौदा मते बाद झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. हर्षल डोके तर सह निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. ए. जे. जायभाय व ॲड. पी. एन. ससाणे तर मदतीसाठी ॲड. नितीन घुमरे, ॲड. पप्पू थोरात, ॲड. सागर पवार यांनी काम पाहिले होते.
परिवर्तन पॅनलचे आठ विजयी उमेदवार
आकाश बाफना (४४३) मंगेश बेदमुथ्था (४१२) महावीर बाफना (३८८) शरद शिंगवी (३७२) निखिल बोथरा (३३२) दिलीप गुगळे (४४८) संतोष फिरोदिया (३५०) कुंदनमल भंडारी (३७९) हे आहेत.
अरिहंत पँनलचे तीन विजयी उमेदवार
माजी अध्यक्ष कांतीलाल कोठारी (३८१)
विनोद बेदमुथ्था (३४५) जितेंद्र बोरा (३५८)
दोन अपक्ष विजयी
संजय गांधी (३०४) लक्ष्मी रवींद्र गादिया (३१६)
असे एकुण तेरा उमेदवार विजयी झाले होते. दि २९ रोजी सकाळी नऊ वाजता मतदानास सुरवात झाली आणि सायंकाळी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाली दि ३० रोजी सकाळी सहा वाजता मतमोजणी झाली होती. हि निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली होती.
आज पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या अध्यक्षपदी दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना तर सेक्रेटरी पदी शरद शिंगवी यांची निवड झाली आहे. सर्वच पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.