जामखेड न्युज——-
मराठा विरुद्ध ओबीसी वाद देवेंद्र फडणवीसच पेटवतात – सुषमा अंधारे
इलाखा तुम्हारा होगा लेकिन धमाका हमारा आमदार प्रा. राम शिंदे यांना आवाहन
मराठा आरक्षण मागणीसाठी शांततेत आंदोलन सुरू असताना आंदोलनाची दाहकता कमी करण्यासाठी भाडोत्री गुंड पाठवून दंगली घडविल्या जातात. मराठा पोरांवर गुन्हे दाखल होतात, ओबीसी नेत्यांना मराठा विरोधी भडकावले जाते हे सर्व राज्यातील बेरोजगारी, दुष्काळ, खिळखिळी झालेली कायदा सुव्यवस्था याकडील लक्ष हटविण्यासाठीच मराठा विरुद्ध ओबीसी वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पेटवतात. आणि सदावर्ते हा देवेंद्रचाच फंटर आहे. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चौंडी येथे केली. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणूक काळात जाहीर आवाहन देऊन येथे येणार त्यावेळी इलाखा तुम्हारा होगा लेकिन धमाका हमारा असे सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी विविध विकास कामांचा कोट्यवधी रुपयांचा भूमिपूजन सोहळा खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, विश्वजीत कदम, सुषमा अंधारे अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सक्क्षणा सलगर, अक्षय शिंदे, प्रा. मधुकर राळेभात, दत्ता वारे, सुरेश भोसले, राजेंद्र पवार, राजेंद्र कोठारी, विजयसिंह गोलेकर, अक्षय शिंदे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संचालक सुधीर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, बापुसाहेब कार्ले, विकास राळेभात, दिपक पाटील, प्रदिप दळवी, किसनराव ढवळे, भीमराव लेंडे, निखिल घायतडक, सरपंच सुनील उबाळे, सचिन हजारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, आगोदर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या जातात ईडीची भीती दाखवली जाते आणी मग भाजप प्रवेश घेतला जातो. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांवर लाठीहल्ले होतात याचा सर्व हिशोब २०२४ ला होणार व राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, राज्य शासनाने विविध कामांवर स्थगिती लावल्याने विलंब होत होता. परंतु त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ती कामे सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यापैकीच जवळपास ७ कोटींच्या कामांचे भव्य भूमिपूजन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी येथे पार पडले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी संग्रहालय बांधकाम, जन्मस्थळी असलेल्या नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण करणे त्याबरोबरच जन्मस्थळी दोन भव्य मोठ्या स्वागत कमानीचे बांधकाम अशा तब्बल ७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन चौंडी येथे पार पडले. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी २ कोटी ३ लाख व सीना नदीवर पश्चिम घाटाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९९ लाख अशी कोट्यावधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यानंतर आता आणखी ७ कोटींच्या विकासकामांचे भव्य दिव्य असे भूमिपूजन चौंडी येथे पार पडले.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यासोबतच चौंडी येथून युवा संघर्ष पदयात्रेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या पुढील टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून युवा संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय शिंदे यांनी केले तर आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजित कदम, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली मनोगते व्यक्त केली.