जामखेड न्युज——
तालुक्यातील नायगाव येथील शेतकऱ्याच्या मुलाची युपीएससी परीक्षेला गवसणी
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील सुशांत कुलकर्णीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुशांत कुलकर्णीने घवघवीत यश संपादन करत तिसावी रँक संपादन केली आहे. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामखेड तालुक्यातील नायगांव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील खेडे गावातील सुशांत सुभाष कुलकर्णी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ वर्षाच्या अंतिम प्रतीक्षा यादीतून ३० रँक मिळवून केंद्रीय सेवेत निवड झाली आहे. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नायगांव येथील सुभाष कुलकर्णी शेतकरी असुन दुष्काळी तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जाणाऱ्या जामखेड तालुक्यात येथील नायगाव हे गाव असून शेतीला कुठलीही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसताना निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुशांत या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याचे समजताच आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.गावात पेढे वाटून आनंद साजरा केला. लहानपणापासून सुशांतने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.
सुशांत कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण १-४ थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे तर ५-१० वी रयत शिक्षण संस्थेच्या पंचक्रोशी विद्यालय नायगाव येथे तर ११-१२ वी दादा पाटील महाविद्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर येथे झाले तर उच्च शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे होऊन ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
प्रचंड मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले. त्याच्या यशाबद्दल नायगांव ग्रामस्थांसह परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.