जामखेड न्युज—-
एकच व्यक्ती, एकदा कुणबी तर एकदा मराठा, एकाच शाळेतील नोंद जामखेड तालुक्यातील प्रकार
मराठे व कुणबी एकच असल्याचा पुरावा
जामखेड तालुक्यातील एकाच घरात भावाचा दाखला मराठा तर बहिण कुणबी असा प्रकार उघडकीस आला असताना आता तर एकाच व्यक्तीची एकाच शाळेत एकाच रजिस्टर मध्ये एकदा कुणबी म्हणून तर एकदा मराठी म्हणून नोंद सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. व मराठा व कुणबी एकच आहेत याचा मोठा पुरावाच समोर आला आहे.
तालुक्यातील अनेक गावात एक भाऊ मराठा व एक कुणबी असा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. आता तर दिघोळ गावातील लक्ष्मण गेणा बेनके जन्म १ जून १९२५ यांची नोंद सुरवातीला मराठा म्हणून होती. यांनी काही दिवस शाळा सोडली नंतर परत शाळेत नाव दाखल करण्यात आले तेव्हा याच शाळेत याच रजिस्टर मध्ये नाव लक्ष्मण गेणा बेनके जात कुणबी जन्म १ जून १९२५ अशी नोंद आहे. यामुळे एकाच व्यक्तीची नोंद एकच शाळेत नावापुढे मराठा व नंतर कुणबी अशी लागलेली आहे.
जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात भाऊ व बहिण यांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात बहिणीची कुणबी तर भावाची मराठा नोंद आहे. यामुळे मराठा म्हणजे कुणबी असल्याचाच हा पुरावा आहे. शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण ताबडतोब द्यावे अशी मागणी होत आहे.
जामखेड तालुक्यात आतापर्यंत 8802 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
साकत सर्कल गावे 12
मराठीतील नोंदी 1004 तर मोडीतील नोंदी 2471
एकुण 3475
अरणगाव सर्कल गावे 14
मराठीतील नोंदी 341
पाटोदा सर्कल गावे 15
मराठीतील नोंदी 824
नान्नज सर्कल गावे 12
मराठीतील नोंदी 557
खर्डा सर्कल गावे 13
मराठीतील नोंदी 1314
नायगाव सर्कल गावे 12
मराठीतील नोंदी 1132
अशा प्रकारे मराठीतील एकुण नोंदी 6327 तर मोडी भाषेतील एकुण नोंदी 2471
एकुण नोंदी 8802 नोंदी सापडल्या आहेत
मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड होत आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ गावात लक्ष्मण गेणा बेनके यांची नोंद मराठा व कुणबी अशी सापडली आहे.
सख्खे भाऊ बहिण असुनही दाखवल्यावर वेगवेगळी नोंद आहे. अजूनही अनेक जणांची अशीच नोंद निघत आहे. आता तर एकाच व्यक्तीची एकदा कुणबी व एकदा मराठा नोंद सापडली आहे.
काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात वेगवेगळ्या नोंदी आहेत.
सध्या शासकीय पातळीवर नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यातच एकाच व्यक्तीची वेगवेगळी नोंद सापडत आहे. यामुळे कुणबी व मराठा एकच आहेत असा अर्थ निघत आहे.