जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाबरोबरच गावबंदीचे फलक
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. शिर्डी तील पंतप्रधान मोदींच्या सभेकडे तालुक्यातील
गावकऱ्यांनी पाठ फिरवली होती गाड्या रिकाम्या परत लावल्या होत्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५८ ग्रामपंचायती पैकी ४५ ग्रामपंचायत हद्दीत सध्या राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी बोर्ड लागले आहेत. उर्वरित ग्रामपंचायत मध्ये दोन दिवसात लागतील म्हणजे जामखेड तालुक्यात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी असेल
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेली मुदत संपत आली आहे. राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्यानंतर आता जरांगे पाटील परत उपोषणाला सुरूवात केली आहे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु आहे. तसेच आज मोदींच्या सभेकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली होती गाड्या रिकाम्या परत लावल्या होत्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणासाठी उग्र आंदोलन सुरू झाले आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसे फलक गावोगावी लागले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमास शासनाच्या वतीने मोफत बस असतानाही नागरिकांनी याकडे पाठ फिरवली व बस रिकाम्याच माघारी गेल्या.
जामखेड तालुक्यात आरक्षणासाठी वातावरण तप्त होऊ लागले आहे. साखळी उपोषण सुरु आहे. दिवसभर एका गावातील लोक उपोषण करतात. आज सावरगाव ग्रामस्थांनी उपोषण केले यादरम्यान संबळ वादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.