सामान्य माणसातील असामान्य नेतृत्व – प्रा. सचिन गायवळ युवकांच्या गळ्यातील ताईत

0
205

जामखेड न्युज——

सामान्य माणसातील असामान्य नेतृत्व – प्रा. सचिन गायवळ

युवकांच्या गळ्यातील ताईत

 

लोकांच्या अडीअडचणी साठी अहोरात्र झटणारे अनेकांना निस्वार्थपणे मदत करणारे खर्डा परिसरातच नव्हे तर संपुर्ण जामखेड तालुक्यातील तरूणांच्या गळ्यातील ताईत सच्चे समाजसेवक म्हणजे प्रा. सचिन गायवळ सर आहेत. परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक उत्साहात सुख दु:खात धावून जाणे मदत करणे हाच त्यांचा महत्त्वाचा गुण आहे.

एक निस्वार्थ समाजसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान – सचिन गायवळ सर अशीच भावना जामखेड सह खर्डा परिसरात आहे.


तालुक्यातील खर्डा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खर्डा येथील चौंडेश्वरी गल्लीत मंडळाच्या वतीने मोठे कार्यक्रम घेण्यात येतात , दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांचे चौंडशवरी मंडळाला चांगले सहकार्य असते .तसेच काल याही वर्षी चौंडेशवरी येथे मोठ्या उत्साहात सचिन सर यांनी देवाची पूजा करून आरती केली , यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


यावेळी खर्ड्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक निस्वार्थ समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.सचिन गायवळ राजकारणाशिवाय समाजकारण, आणि समाजसेवा कशी करायची याचा आदर्शच प्रा सचिन गायवळ सरांनी समाज, राजकारणी आणि तरुणांपुढे घालुन दिलाय आणि त्यामुळेच प्रा सचिन गायवळ यांची लोकप्रियता खर्डा परीसर आणि जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे.

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही खर्डा परिसरातील सर्वसामान्य जनता प्रा सचिन गायवळ यांना आपल्या हक्काचा युवा नेताचं मानते, खर्डा परीसरात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची अडचण कुठलीही असो प्रा सचिन गायवळ नेहमीचं निस्वार्थ भावनेने मदतीस तत्पर हजर असतात म्हणुनचं प्रा सचिन गायवळ खर्डा परीसरतील युवकांचे प्रेरणास्रोत बनलेत. सर्व कार्यक्रमात हिरिरीने हमखास सहभागी होत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here