डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी सत्तार शेख, उपाध्यक्षपदी सुदाम वराट तर सचिवपदी अविनाश बोधले यांची निवड 

0
251
जामखेड प्रतिनिधी    
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) 
महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी जामखेड टाईम्सचे मुख्यसंपादक सत्तार शेख यांची तर  उपाध्यक्षपदी जामखेड न्यूजचे संपादक सुदाम वराट तसेच सचिवपदी रोखठोक न्यूजचे संपादक अविनाश बोधले यांची आज निवड करण्यात आली आहे.
डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजा माने यांनी आज घोषणा केली आहे.यामध्ये जामखेड तालुकाध्यक्षपदी जामखेड टाईम्सचे संपादक सत्तार शेख यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणीकडून तालुकाध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्ष सत्तार शेख यांनी जामखेड तालुक्यामध्ये डिजीटल मिडीयात स्वतंत्र पत्रकारिता करत असलेल्या संपादकांची आज जामखेडमध्ये बैठक घेतली. या बैठकीत जामखेड तालुक्यात डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी जामखेड न्यूज पोर्टलचे संपादक सुदाम वराट यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी रोखठोक न्यूज पोर्टलची संपादक अविनाश बोधले यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे नवे पदाधिकारी खालील प्रमाणे
तालुकाध्यक्ष- सत्तार शेख ( जामखेड टाईम्स) , उपाध्यक्ष सुदाम वराट (जामखेड न्यूज ), सचिव – अविनाश बोधले (रोखठोक न्यूज), सदस्य – फारूक शेख (एफ एम स्टार न्यूज ) सदस्य – संदेश हजारे ( द संदेश) यांचा समावेश आहे.
राज्य कार्यकारणी खालील प्रमाणे
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज केली. संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार(पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे(सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत.संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.  पदाधिकाऱ्यांची नावे अशी,
राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले(मुंबई), मोहन राठोड (पुणे), किशोर मरकड (अहमदनगर),सविता कुलकर्णी (नागपूर), दिपक नलावडे (ठाणे), प्रमोद मोरे(कोल्हापूर) पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), संतोष सूर्यवंशी (बार्शी), राज्य कायदा सल्लागार एड.अतुल पाटील (पुणे),प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल उंबरे (पंढरपूर), सरचिटणीस नितीन पाटील (पुणे), मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप माने (परभणी), सरचिटणीस देव शेजूळ (औरंगाबाद) सोशल मिडिया प्रसिद्धी राज्य समन्वयक मोसिन शेख(औरंगाबाद), सहसमन्वयक सचिन डाकले (नवी मुंबई) शामल खैरनार (पुणे शहर अध्यक्ष)  महेश कुगांवकर(सचिव), डॉ.बिनू वर्गीस (ठाणे जिल्हा अध्यक्ष), संतोष मानूरकर (बीड जिल्हा अध्यक्ष), प्रशांत चुयेकर (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), डॉ.सुनिल पाटील, इस्लामपूर (सांगली जिल्हा अध्यक्ष), सतीश सावंत, सांगोला (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), शंकर जाधव (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष), विजय बाबर (सोलापूर शहर अध्यक्ष) प्रा. सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), विनायक कलढोणे (इचलकरंजी अध्यक्ष), अजय ऊर्फ पिंटू पाटील (बार्शी तालुका अध्यक्ष),सत्तार शेख (जामखेड तालुका अध्यक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here