जामखेड न्युज——
बच्चू कडू यांच्या आदेशानुसार नगरपरिषद निवडणूक प्रहार जनशक्ती पक्षाच्या बॅनरखाली लढविणार – नय्युम सुभेदार
आगामी जामखेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रहार जनशक्ती पक्षाच्या बॅनरखाली लढविण्याचे बच्चु कडू यांनी आदेश दिले असून. यासाठी जामखेड येथे लवकरच बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील दिव्यांग, शेतकरी व महिलांसाठी असलेल्या योजनांचा लाभ गोरगरीब व गरजूना मिळावा यासाठी तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार यांचासह जिल्हय़ातील शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन बच्चुभाऊ कडू यांची भेट देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीबाई देशमुख, जामखेड तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, शेवगाव तालुक्यातील सुकळीचे सरपंच लहु भवर, गायकवाड जळगावचे सरपंच जगन्नाथ गरड, युवा कार्यकर्ते धनंजय पवार, सुनिल गरड, जवळा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष राहुल भालेराव, दिव्यांग सेलतालुका अध्यक्ष सचिन उगले आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीत बच्चुभाऊ कडू यांनी शेवगाव तालुक्यातील सुकळी व गायकवाड जळगाव येथील ग्रामपंचायतचे दोन्ही सरपंच प्रहार जनशक्ती पक्षाचे असल्याने त्या गावातील विकास कामांसाठी निधी दिला.
तर जामखेड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याचे आदेश दिले व यासाठी मी लवकरच जामखेड येथे येण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकरी महिला व दिव्यांग यांच्या साठी काम करावे. अश्याही सुचना यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिल्या.