जामखेड न्युज——
पुण्यातील मतदारांची जवळा शेतकरी ग्रामविकास आघाडीस पसंती
जवळा शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पुणे परिसरात असलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी कात्रज, भोसरी व चाकण येथे बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदार उत्फुर्त पणे आले होते. यातील अनेकांनी मत व्यक्त करत जवळा गावच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी ग्रामविकास आघाडीसोबत राहणार असे ठामपणे सांगितले.
जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. जवळा ग्रामपंचायत अंतर्गत असणारे अनेक मतदार पुणे परिसरात कामाधंद्यानिमित्त आहेत. या मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रमुखांनी पुणे परिसरातील कात्रज, भोसरी व चाकण येथे बैठक घेत शेतकरी ग्रामविकास आघाडीचे गावच्या विकासाचे व्हिजन सांगितले. तेव्हा सर्वानीच आपण शेतकरी ग्रामविकास आघाडीबरोबर असल्याचे मान्य केले.
जवळा गावच्या विकासाचे व्हिजन व कै. श्रीरंग भाऊ कोल्हे, कै. किसनराव दळवी, कै. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जवळा गावच्या विकासासाठी शेतकरी ग्रामविकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. यानुसार पुणे परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी व कात्रज, भोसरी व चाकण येथे बैठका घेण्यात आल्या
मतदारांच्या उत्फुर्त प्रतिसादामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचा एकतर्फी विजय होणार असे बोलले जात आहे.