जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात मात्र कर्जत-जामखेड मधील प्रश्न सोडवण्याकडे त्यांचे लक्ष नाही स्वतःचा बारामती अॅग्रोचा व्यवसाय वाढवण्यात गुंतलेले आहेत मतदारसंघातील समस्यांचे त्यांना देणे घेणे नाही कामांमध्ये कधीतरी मात्र श्रेय घेण्यामध्ये सर्वात आधी आसतात अशी रोहित पवारांची ख्याती आहे. अशी टिका आमदार रोहित पवार यांनी केली.
घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकार आरक्षण विरोधी आहे अशीही टिका केली तसेच आमदार रोहित पवार यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे श्रीगोंदा कर्जत चा हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेल्या रोहित पवार हे कामामध्ये कधीकधी आणि श्रेया मध्ये सर्वात आधी असल्याचं म्हटलं आहे आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं रोहित पवार केंद्र सरकार वर बोलतात मात्र आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही बारामती ॲग्रो च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्याच्या खाद्यांने मोठे नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचे सांगत रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित वर्जन असून गेल्या पाच पिढ्याची शरद पवारांनी माती केली आहे आता पुढच्या पाच पिढ्याची रोहित पवारांमुळे माती होईल असं पडळकर म्हणाले.
ते म्हणाले की, सरकार मध्ये सगळा सावळा गोंधळ
असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे या खात्याचा मंत्री आहे त्या खात्याचे निर्णय दुसराच मंत्री जाहीर करतो मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील दुसऱ्या मंत्र्याला मान्य मान्य नसतो राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेने आजपर्यंत कधी अनुभवलेला नव्हता असा टोला पडळकरांनी लगावला आहे.