जामखेड न्युज——
प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नय्युम सुभेदार, मुस्लिम पंच कमीटीच्या वतीने सत्कार
प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नय्युम सुभेदार यांचा मुस्लिम पंच कमीटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर काझी, उपाध्यक्ष हाजी मंजूर अमीर, मुक्तार सय्यद, इस्माईल सय्यद, शेरखान भाई, इम्रान कुरेशी, अरमानभाई शेख, इस्माईल शेख (टेलर) याकुब तांबोळी, परवेज खान असिफ शेख, जावेद सय्यद (बारूद) जावेद बागवान, अर्शद शेख, नाजीम काझी, शेख जाहेरभाई (मिस्त्री) जाफर सय्यद, हाजी नादीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
नय्युम सुभेदार हे आ. बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील सर्वच समाजातील दिव्यांग, विधवा, परित्यक्ता तसेच निराधार असलेल्या वंचित समाज घटकांसाठी मोठे काम करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व सत्कार होत आहेत.