जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते तसेच आँक्सीजनची कमतरता, रूग्णांना बेड उपलब्ध होईल की नाही अशी स्थिती होती तसेच कोवीड रूग्ण म्हटले की भिती वाटते अशा परिस्थितीत मेडीकल शिक्षण घेत असलेली युवती डॉ. स्नेहा सूर्यकांत मोरे पुढे येऊन रूग्णांची सेवा करते. कोवीड बाधीत होऊनही सेवा पुढे धाडसाने चालू ठेवते कोणताही मोबदला न घेता कार्य केले त्यामुळे तिचे व तिच्या आईवडिलांची कौतुक करावे तेवढे कमी आहे. शासनाच्या रुग्ण कल्याण समितीने तिच्या कार्याची दखल घेऊन कोवीड योध्दा म्हणून सन्मानपूर्वक केलेला सत्कार यथायोग्य असल्याचे प्रतिपादन कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्रामीण रुग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीच्या वतीने सन २०२० – २१ चा कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा
कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी पंचायत समिती सभापती सुर्यकांत मोरे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, अशोक धेंडे, डॉ. चंद्रकांत मोरे, नगरसेवक आमित जाधव, माजी सभापती सुभाष आव्हाड, बापूराव शिंदे आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी अर्चना नष्टे पुढे म्हणाल्या सध्या रूग्ण संख्या कमी झाली तरी कोरोना गेलेला नाही तरीही नागरिक बेफिकीर वागत आहे विनामास्क फिरणा-यावर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येत आहे हे दुदैव आहे त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून संभाव्य तिसरी लाट टाळावी असे आवाहन नष्टे यांनी केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे शासनाच्या आवहानाला प्रतिसाद देऊन येथील डॉ. स्नेहा सुर्यकांत मोरे यांनी बिडीएस च्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असताना डॉ. अरोळे कोवीड हॉस्पिटलला सेवा देण्याचा धाडसी निर्णय घेतला तसेच तिचे पालक सभापती राजश्री मोरे व सुर्यकांत मोरे या दाम्पत्यांनी कोविड सेंटरला काम करण्यासाठी परवानगी दिली याबद्दलआरोग्य खात्याच्या वतीने आभार व्यक्त करीत आहेत.
प्रा. मधुकर राळेभात म्हणाले या कोरोना काळात काम करत असताना देशात दोन हजार पेक्षा डॉक्टर मृत्यू पावले अशावेळी डॉ. स्नेहा मोरे यांनी धाडसी निर्णय घेऊन काम केले. असंख्य नागरिक कोरोना बाधीत झाले अशावेळी त्यांना धीर देण्या ऐवजी समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वाळीत टाकल्या सारखे होतो अशा परिस्थितीत रूग्णांची सेवा डॉ स्नेहाने विनामूल्य सेवा केली याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
सत्कारमूर्ती डॉ. स्नेहा मोरे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या डॉ. आरोळे हॉस्पिटलमधे डॉ. रवी व शोभा आरोळे हे कोरोना रूग्णावर मोफत उपचार करीत आहेत असे ऐकले यामुळे आपणही या राष्ट्रीय आपत्तीत समाजाचे देणे लागतो म्हणून सेवा करावे असे वाटले मी तेथे काम करण्यास सुरुवात केली. डॉ. रवी आरोळे यांनी यावेळी सेवा कशी करावी याचे धडे दिले या काळात कोरोना रूग्णांची सेवा करताना दहाव्या दिवशी पॉझिटिव्ह आले व तेथेच उपचार घेऊन बरे झाली व रूग्णाची सेवा करत राहीली. मी जामखेड येथे हॉस्पिटल सुरू केल्यानंतर गोरगरीब रूग्णांसाठी मोफत सेवा करण्याची ग्वाही डॉ. स्नेहा मोरे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संतोष सरसमकर यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघ यांनी केले.