जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहर व खर्डा येथील मदारी समाज बांधवांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य व किराणा वाटप शुक्रवार दि. ११ जून रोजी खर्डा येथील मदारी वस्तीमध्ये करण्यात आले.
ग्रामीण विकास केंद्र जामखेड चे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते महिनाभर पुरेल एवढे गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, खाद्यतेल, शेंगदाणे, गूळ, मिरची पावडर, आंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण, सॅनिटरी पॅडचे वाटप 50 कुटुंबांना करण्यात आले. यावेळी खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच लोखंडे, रवी सुरवसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, वैजिनाथ पाटील, कांतीलाल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दलित, आदिवासी, भटके, विमुक्त समाजातील गोरगरीब कुटुंबांना विशाल पवार, पोपट फुले, मिसाळ, लहू शिंदे, वैजिनाथ केसकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारका पवार, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे आदी कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.