Friday, February 6, 2026
Home ताज्या बातम्या शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या जगदंबा प्रतिष्ठान गणेश मंडळाची आमदार प्रा. राम...

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या जगदंबा प्रतिष्ठान गणेश मंडळाची आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आरती

0
354

जामखेड न्युज——

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या जगदंबा प्रतिष्ठान गणेश मंडळाची आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आरती

 

जगदंबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या गणेश मंडळाची आरती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच आज गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या बरोबर भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सुनील यादव, जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गुंदेचा, जाकीर शेख सर, मनोज बोळे, बजिरंग (नाना) कुलथे, अजय गाडेकर, किरण भुजबळ, विठ्ठल कुलथे, विरेश गुंदेचा, अशोक पोहरे, किशोर शेलार, ऋतुराज फुटाणे, पिनू अष्टेकर, कैलास खेत्रे, हनुमंत विटकर, गुलाब जाधव, लक्ष्मण पवार, विशाल निमोणकर, दिपक सुरसे, बाळू निमोणकर, प्रविण चोरडिया, वैभव कार्ले यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


जगदंबा प्रतिष्ठान तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात यामध्ये भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव सोहळा, महिला व मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण, परिसरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, शिक्षक, आरोग्य सेवक, व्यापारी, गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात येतो. याचबरोबर गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. आज आरती व महाप्रसाद यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!