जामखेड न्युज——
जनविकास सेवाभावी गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा घ्यावा – लक्ष्मी पवार
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनविकास सेवाभावी मंडळ जामखेड आयोजित गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी केले आहे.
शनिवार दि. २३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता लिंबू चमचा तर ८.३० बोलका बाहुला हा संतोष सरसमकर यांचा कार्यक्रम झाला तसेच रविवार दि. ७.०० वाजता संगीत खुर्ची तर ८.३० वाजता बालकीर्तनकार हभप ईश्वरी महाराज नागरगोजे यांचे किर्तन असे कार्यक्रम झाले.
आज सोमवार दि. ७.०० वाजता भव्य लकी ड्राँ. तसेच ८.३० वाजता ब्रम्हकुमारी भारती दिदी ओंमशांती जामखेड यांचे गणपतीचे अध्यात्मिक रहस्य तर उद्या मंगळवार दि. १२ ते ५ महाप्रसाद तर सायंकाळी ८ ते ९ जगतगुरू तत्वदर्शी रामपाल महाराज यांचे संत कबीर माहिती पट सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ गोरोबा टाँकिजसमोर कुंभार तळ जामखेड असे आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी लक्ष्मी पवार, निशा पवार, मिरा तंटक, शोभा जमदाडे, साधना जाधव, उज्जला समुद्र, राणी भोसले, सुभद्रा घायतडक, नंदा शेगर, रूक्सना पठाण, विजय कुलकर्णी, उपेंद्र आढाव, संतोष पिंपळे, हर्षद काळे
जामखेड तालुक्यातील जनविकास सेवाभावी संस्था मार्फत श्रीमती लक्ष्मी पवार या भटक्या समाजातील लोकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणीक काम करत आहेत. भटक्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्न करीत असून त्यांनी पारधी समाजातील अनेक मुलांचे जातीचे दाखले काढले असून त्यांना नेहमी अधार देण्याचे काम करत आहे. त्यांनी त्यांचे स्वतः च्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण केला आहे. ही अभिमानाची बाब आहे. आता गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यामुळे परिसरातील नागरिक याचा मनमुराद आनंद उपभोक्तत आहेत.