जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये सुपरहिट कलाकार उडविणार हस्याचे फवारे
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – रमेश (दादा) आजबे
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांचा वाढदिवस २९ सप्टेंबर रोजी असून वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पदाधिकारी यांनी जामखेड करांसाठी खास हास्याच्या मेजवानीसाठी राज्यातील नामवंत हास्य कलाकार यांना आमंत्रित केले आहे. हे सुपरहिट कलाकार हास्याचे फवारे उडविणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.
महाराष्ट्रातील हास्य कलाकार अरूण कदम – हास्यजत्रा फेम, कमलाकर सातपुते काँमेडी एक्सप्रेस फेम, मानसी नाईक डान्स गृपसह, अभिजीत कोसंबी- सारेगम फेम, योगिता गोडबोले- पार्श्वगायिका असे प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत.
दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता नागेश विद्यालय जामखेड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी नेहमीच साजरा होत असतो. त्यामध्ये रक्तदान शिबिरे, मुलांना शालेय साहित्याचे, गणवेशाचे वाटप, रुग्णांना मदत, आरोग्य शिबिरे आदी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. याही वर्षी वरील कार्यक्रमाबरोबरच सुपरहिट कलाकार हास्याचे फवारे उडविणार आहेत. जामखेड करांसाठी ही खास संधी आहे.