जामखेड न्युज——
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ल. ना. होशिंग विद्यालयात पाककृती स्पर्धा
ल ना होशिंग विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यालयामध्ये पाककृती स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व पालकांनी तसेच स्वयंपाकी मदतनीस यांच्या मधूनही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश मोहिते , गीते सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक श्री,बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड,समारंभ प्रमुख श्री पोपट जगदाळे,शिक्षक प्रतिनिधी किशोर कुलकर्णी,एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, लहाने भरत, विशाल पोले, विजय क्षीरसागर, आदित्य देशमुख, साईप्रसाद भोसले, श्रीमती प्रभा आखाडे मॅडम, श्रीमती वंदना अल्हाट मॅडम,श्रीमती पूजा भालेराव मॅडम, श्रीमती कारंडे रेश्मा मॅडम,श्रीमती देविका फुटाणे मॅडम,श्री ईश्वर कोळी (ओ.एस.) सावंत भाऊसाहेब प्रवीण कुलकर्णी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पाककृतीचे परीक्षण जूनियर कॉलेज श्रीमती साबळे मॅडम,श्रीमती भोसले मॅडम तसेच श्रीमती संगीता दराडे मॅडम श्रीमती सुप्रिया घायतडक मॅडम यांनी परीक्षण केले.
जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश मोहिते यांनी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पाककृतींचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना तृणधान्य (कडधान्य) यांचे आपल्या दैनंदिन आहारातील महत्त्व पटवून दिले.