शिपायाचा मुलगा सहाय्यक विक्रीकर अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रात पाचवा श्रीकृष्ण हनुमंत वराट यांच्या यशाबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार

0
209

जामखेड न्युज——

शिपायाचा मुलगा सहाय्यक विक्रीकर अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रात पाचवा

श्रीकृष्ण हनुमंत वराट यांच्या यशाबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार

 

तालुक्यातील साकत येथील हनुमंत वराट हे ल. ना. होशिंग विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत त्यांचा मुलगा श्रीकृष्ण हनुमंत वराट यांने एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर सहाय्यक अधिकारी परीक्षेत (ओबीसी प्रवर्गात) पाचवा क्रमांक पटकावला आहे यामुळे श्रीकृष्णचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबद्दल माजी विद्यार्थी म्हणून श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेव मुरूमकर, सत्कार मुर्ती श्रीकृष्ण हनुमंत वराट, वडील हनुमंत वराट तसेच शिक्षक राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्रीकृष्ण हनुमंत वराट हा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत श्री साकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. २०१२ मध्ये त्यांने ८८.७३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. तो एक गुणी विद्यार्थी होता. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरदार हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे मंत्रालय लिपीक पदावरही नियुक्ती झाली व साहाय्यक विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे. एकाच वेळी दोन पदे मिळाली आहेत.

विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून श्री साकेश्वर विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण हनुमंत वराट म्हणाले की, जिद्द, चिकाटी व मेहनत घेतली की, यश मिळतेच जरी अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करा यश मिळतेच तसेच अभ्यासात सातत्य ठेवा असा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांची तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here