जामखेड न्युज——
ज्ञानेश्वरीत जीवनाचे तत्त्वज्ञान आहे – प्राचार्य डोंगरे
जामखेड महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न
जामखेड महाविद्यालय जामखेड, राष्ट्रीय सेवायोजना व संस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थांनी प्राध्यापकांची दिवसभर अत्यंत चांगल्या प्रकारे भुमिका बजावली. ज्ञानेश्वरी ग्रंथात जीवनाचे खरे सार आहे असे प्राचार्य एम. एल. डोंगरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डोंगरे एम. एल होते. तसेच उपप्राचार्य डाॅ. सुनील.नरके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा अविनाश फलके , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नमाला देशपांडे, विद्यार्थी प्राचार्य प्राजक्ता मोरे इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थी प्राध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्राचार्य प्राजक्ता मोरे यांनी एकदिवसीय प्राचार्य काळातील आपले अनुभव व्यक्त करताना प्राचार्या पदासमोरील विविध अडचणी असतात यातून मार्ग काढत संपूर्ण जवाबदारी पूर्ण करावे लागते. या आठवणी कायम स्मरण राहतील असे आपले मत मांडले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नमाला देशपांडे यांनी मनोगतामध्ये गुरू आणि विद्यार्थी यांच्या नातेतील संबंध या बाबतीत प्रकाश टाकत गुरू हे जीवनातील महत्वपूर्ण व्यक्ती असून ते नेहेमी विद्यार्थी हित पाहत असतात. ही भावना व्यक्त केली. उपप्राचार्य डॉ. सुनील नरके यांनी गुरू हे आपल्यासाठी महत्वपूर्ण भाग असून त्याचा नेहेमी आदर केला पाहिजे. ज्या व्यक्तीने मोठे केले आहे. त्याला कधी ही विसरून जाऊ नका. हे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगात प्राचार्य डाॅ. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद करत असताना गुरू आणि विद्यार्थी यांच्या नाते संबंधी सखोल विवेचन केले. काळखंडानूसार गुरू शब्दातील व्याप्ती मधील बदल त्यांनी मांडला. गुरू पासून ते सर या शब्दांपर्यंत झालेला बदल आणि त्यामागील भूमिका थोडक्यात सांगितली. तसेच वेद, उपनिषद, गीता यांचे ज्ञान मराठी मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथा मध्ये आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथ विषय संत नामदेव महाराज याचा अभंग “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवा” या चरणाचा उल्लेख करत ज्ञानेश्वरीतील जीवनाचे तत्वज्ञान समजावून घेणे किती गरजेचे आहे. व जीवनात उपयोग करून जीवन सुंदर, चांगले करता येईल. हे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रा.मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रा.दळवी सायली यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन विद्यार्थी प्रा. पोकळे अश्विनी व सांगळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.