विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकांची भूमिका कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
127

जामखेड न्युज——

विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकांची भूमिका

कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकांची भूमिका दिवसभर शालेय कामकाज विद्यार्थांनी सांभाळले.

शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा आणि पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक, अपुर्णाला पुर्ण करणारा शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढवणारा शिक्षक, जगण्यातुन जीवन घडवणारा, तत्वातुन मुल्य फुलवणारा शिक्षक आशा या देवतुल्य शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शवणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय


हा दिवस विद्यार्थ्यांसाठी पर्वनीच. कालिका पोदारच्या विद्यार्थ्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला मुख्याध्यापक प्रशांत जोशी,व शाळेचे संचालक सागर अंदुरे सर, निलेश तवटे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. तदनंतर विद्यार्थीशिक्षकांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले.


विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले.नाट्य,नृत्य,गायन सादर केले.या दिवशी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून संपुर्ण शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.व आपली शिक्षकांप्रतिची कृतज्ञता व्यक्त केली.

 

माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शिक्षकांची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. तसेच शाळेचे विविध कामकाजदेखील त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here