शिक्षकदिनीच शिक्षिकेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन जामखेड परिसरात एकच खळबळ

0
452

जामखेड न्युज——

शिक्षकदिनीच शिक्षिकेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन जामखेड परिसरात एकच खळबळ

 

जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी व सर्व जामखेड शहराला परिचित असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सुनिता राजेंद्र गायकवाड यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या आष्टी शहरातील अनिषा ग्लोबल स्कुल येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आजच्या शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने जामखेड शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


आज दि. ५ रोजी शाळेत आयोजित शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२:०० वाजताचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या खुर्चीवर खाली कोसळल्या.

त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असुन अत्यंसंस्कार आज दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.

मयत सुनिता राजेंद्र गायकवाड यांच्या मृत्युमुळे जामखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली असा परिवार आहे.

  चौकट

गेल्या दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. यातच खाजगी संस्थेत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते यातूनच शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आहे यामुळे अशा घटना घडत आहेत. यातच अनेक वर्षे नोकरी करून पेशन्स नाही. यामुळे मानसिक दडपणाखाली शिक्षक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here