जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग विद्यालयात वृक्ष रक्षा बंधन मोठ्या उत्साहात संपन्न
टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रमांतर्गत राखी प्रदर्शन
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड येथे वृक्ष रक्षा बंधन उत्सवानिमित्त टाकाऊ मधून टिकाऊ कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत राखी प्रदर्शन घेण्यात आले त्यासोबतच विद्यार्थ्यांची कार्यशाळा ही घेण्यात आली प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी सौ. जयश्रीताई देशमुख, सौ अंजलीताई चिंतामणी, सौ दीपाताई देशमुख, संगीता ताई देशमुख, अनिस खान मॅडम, सौ.प्रांजल चिंतामणी त्याचबरोबर संचालक श्री सैफुल्ला खान साहेब, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड सर्वांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
आज रक्षाबंधनानिमित्त राखी प्रदर्शन व त्याचबरोबर शाळेतील विविध झाडे यांनाही आज राखी बांधण्यात आली. त्याच बरोबर एनसीसी विभागाच्या वतीने सैनिकांना राख्या पाठवायचे आहेत. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे राख्या निर्मिती केल्या सुंदर असे प्रदर्शन झाले विद्यार्थी प्रदर्शन पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भाव उत्कटता याचे सर्वांना विशेष वाटले त्याचबरोबर प्रदर्शनाच्या निमित्ताने प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगत मध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वस्तू कशा तयार कराव्यात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक वेगळा दृष्टिकोन या प्रदर्शनाच्या निमित्ताने देण्याचा उद्देश नक्कीच सफल झाला आहे असे सांगितले.
त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील सर्व झाडांना रक्षाबंधनाच्या निमित्त संवर्धनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या बांधण्यात आल्या, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्ष संवर्धन झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन कोणती झाडे महत्त्वाची आहेत. त्या निमित्ताने निसर्गाशी जवळीक विद्यार्थ्यांना करता आली किंवा त्यांना नेता आलं तेही भविष्यात काळजी घेतील वृक्ष आहोत तर आपण आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरे या प्रदर्शनासाठी समारंभ प्रमुख पोपट जगदाळे शिक्षक प्रतिनिधी किशोर कुलकर्णी उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक राऊत मुकुंद, संगीता दराडे, सुप्रिया घायतडक, वंदना आल्हाट, वाकळे, पूजा भालेराव, प्रभाआखाडे, देविका फुटाणे, सुपेकर आदित्य देशमुख, साई भोसले, विशाल पोले, बबन राठोड.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राऊत मुकुंद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुखअनिल देडे.आभार प्रदर्शन सुप्रिया घायतडक यांनी केले.