आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने आकारास आलेल्या कुसडगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या मैदानावर मेरी माटी-मेरा देश! अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न!!!

0
212

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने आकारास आलेल्या कुसडगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या मैदानावर मेरी माटी-मेरा देश! अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न!!!

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रात नागरिकांना बरोबर घेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. कुसडगावच्या दौंड येथे कार्यरत असलेल्या SRPF बटालियनने पोलीस अधीक्षक दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुसडगाव प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून एस आर पी एफ च्या कामासंदर्भात आणि शस्त्रांसंदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक दिले व वृक्षारोपणही करत भालाफेक, गोळाफेक, 100 मीटर रनिंग,खो खो,हॉलीबॉल,कबड्डी खेळ अशा अनेक स्पर्धांच आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी दिलीप खेडेकर, विकास पाटील साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बापुराव ढवळे, सरपंच राजेंद्र ओमासे, कुसडगावचे सरपंच पप्पू कात्रजकर, अजय सातव, नजिरभाई यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  आमदार प्रा राम शिंदे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व प्रयत्नाने ओसाड माळरान असलेल्या भागात एसआरपी केंद्र वसवले यामुळे हे ठिकाण महाराष्ट्राच्या नकाशावर आले. हे ठिकाण आज जामखेड तालुक्याच्या केंद्रबिंदु ठरलयं

कुसडगावच्या शासकीय माळरानाचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर व्हावा या उद्देशाने त्याठीकाणी पोलीस ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय आमदार प्रा.राम शिंदे यांनी  घेतला आणि युध्दपातळीवर पाठपुरावा सुरू केला पण कधी सत्तेत तर कधी विरोधात असल्यामुळे अनेकवेळा अडचणीही आल्या पण शेवटी त्यांच्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच करत असलेल्या प्रमाणिक प्रयत्नांना यश आल आणि कुसडगावच्या ओसाड माळरानावर पोलीस ट्रेनिंग सेंटरला उभा राहीलं.2016/17 ला प्रक्रिया सुरू झाली आणि 2023 ला ट्रेनिंग सेंटर सुरू झालं थोडा वेळ लागला पण तरीही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे की शासकीय जमीन सर्वसामान्य आणि शासनाच्याचं उपयोगी आली.

ती जमीन स्थानिक लोकांना हाताशी धरून कवडीमोल भावात कुटुंबियांना,नातेवाईकांना कंपन्यांसाठीही देता आली असती पण तसा कधी प्रयत्नही झाला नाही म्हणुनचं आजं कुसडगाव हे नावं महाराष्ट्राच्या नकाशात स्पष्टपणे झळकत आहे!
याच ठिकाणी  मेरी माटी-मेरा देश! अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले व त्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here