जामखेड न्युज——
साकत घाटाचे रूंदीकरण करून संरक्षक कठाडे बसवावेत – युवा नेते नागराज मुरूमकर
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो म्हणून वाहनचालक पर्यायी साकत मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करतात. मोठ्या व अवजड शाहनाना घाटात वळण बसत नाही यामुळे अनेक अपघात होतात. यामुळे साकत घाटाचे रूंदीकरण करून संरक्षक कठाडे बसवावेत अशी मागणी भाजपाचे युवा नेते नागराज मुरूमकर यांनी केली आहे.
तसेच बांधकाम विभागास पत्र लिहून त्यांनी म्हटले आहे की, साकत घाटातील साकत कडून येताना पहिल्या वळणावर संरक्षण कठाडा उभारण्यात यावा अनेक गाड्यांचे ब्रेक फेल झाल्यामुळे दोन ते तीन व्यक्तींनी जीव गमावला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे साकत कडून सिमेंट घेऊन येणारा ट्रक सरळ खाली गेला त्यामध्ये जीवित हानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणावर त्यामुळे या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेवर जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी संरक्षण कठाडा उभारण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. काम खुपच संत गतीने सुरू आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे आहेत यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात. अनेक वेळा मोठ्या गाड्यांना घाटात वळण बसत नाही यामुळे दुर्घटना घडत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी बारामती येथील डायनॅमिक्स कंपनीचा दुधाचा टँकर एम एच 42 टि 0954 हा दुधाचा टँकर पलटी झाला होता. टँकर मधील जवळपास निम्मे दुध सांडले होते
साकत घाटाचे रूंदीकरण करावे
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. काम खुपच संत गतीने सुरू आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे आहेत यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात. अनेक वेळा मोठ्या गाड्यांना घाटात वळण बसत नाही यामुळे दुर्घटना घडत आहेत. यामुळे साकत घाटाचे रूंदीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच संरक्षक कठाडे बसवावेत अशी मागणी होत आहे.