जामखेड प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारी मुळे तसेच प्राप्त परिपत्रकानुसार नागरिकांनी आपापल्या घरीच राहुन विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम करावेत कोणीही भीमा कोरेगाव येथे 144 कलम लागू आहे त्यामुळे तेथे जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सभांजी गायकवाड यांनी आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीत केले.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, भीम टोला तालुकाध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिष पारवे, प्राचार्य विकी घायतडक, किशोर कांबळे, रवी सोनवणे, विकी गायकवाड यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, 01 जानेवारी 2021 भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम अनुषंगाने बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी
आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, जामखेड मधील प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व भीम सैनिक यांची बैठक घेवुन त्यांना महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडील 01 जानेवारी 2021 भीमा कोरेगाव संदर्भात प्राप्त परिपत्रकानुसार योग्य त्या सूचना देऊन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने दक्षता घेणेबाबत तसेच विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम आपले घरीच प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करणे बाबत सुचना देण्यात आल्या.कोणीही भीम सैनिक भीमा कोरेगाव येथे जाणार नाही असे आश्वासन यावेळी देण्यात आले.