जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त,
आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री व सामाजिक कार्यकर्त्यां सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज हवाशेठ (दादासाहेब) सरनोबत मित्रमंडळ व राहुल उद्योग समूहाच्या वतीने कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधील रूग्ण व स्टाफला सुरूची स्नेहभोजन देण्यात आले.
यावॆळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे पै. हवाशेठ (दादा) सरनोबत, सरपंच बापुसाहेब कार्ले, उपसरपंच नागेश कात्रजकर, प्रदिप टापरे, प्रल्हाद डिसले, धनंजय राऊत, शेखर कार्ले, सनी सदाफुले, वैभव कोल्हे, बाळू साठे, भरत भोगल उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित श्री साकेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

कुसडगाव, भोगलवाडी, सरदवाडी, खांडवी, डिसलेवाडी, फक्राबाद, धानोरा येथे सुमारेएएक हजार गोल्डन सिताफळाची लागवड करण्यात आली. व परिसरातील ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी भरत भोगल, बाळू साठे, दत्ता सरनोबत, राहुल जगताप यांच्या सह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला सुरूची स्नेहभोजन भोजन देण्यात आले तसेच मोहा येथिल निवारा बालगृहातील मुलांना सुरूची भोजन देण्यात आले यावेळी निवारा बालगृहाचे संस्थापक डॉ. अॅड अरूण जाधव हे उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पै. हवाशेठ (दादा) सरनोबत व राहुल उद्योग समूहाच्या वतीने आरोळे कोविड सेंटरला व मोहा येथिल निवारा बालगृहातील मुलांना सुरूची भोजन देण्यात आले तसेच परिसरात सिताफळाची सुमारे एक हजार झाडांची लागवड करण्यात आली व ग्रामस्थांना झाडांचे वाटप करण्यात आले. व साकेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा देण्यात आला या सामाजिक उपक्रमाबद्दल हवा (दादा) सरनोबत व राहुल उद्योग समूहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आमदार रोहित हे विधानसभेत दिसत असले तरी त्यांचे अवघं कुटुंबच मतदारसंघाच्या विकासकामांत रमलं आहे. विशेषतः त्यांच्या आईसाहेब म्हणजेच सुनंदाताई यांचे बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष आहे.मतदारसंघात पाणलोटविकास असेल नाही तर महिला सक्षमीकरण यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आता त्यांनी कर्जत-जामखेडच्या सुंदरतेकडे लक्ष वेधले आहे.आपलं शहर स्वच्छ व सुंदर व्हावं आपल आरोग्य चांगल राहवं याकरिता ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ च्या निमित्ताने कर्जत-जामखेड ही दोन्ही शहरे दुर्गंधीच्या विळख्यातून मुक्त होऊन अव्वल स्थानी यावेत याकरिता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री, अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पाठोपाठ जामखेड शहरातही कामाला सुरूवात केली आहे.
येथील प्रभागनिहाय बैठका घेतल्या या अभियानात विविध संघटना, व्यापारी, डॉक्टर संघटना व अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी एकत्र येऊन आपले योगदान द्यावे,” असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जामखेड येथे केले. दरम्यान, आमदार पवार हे जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे वडील अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हे दोन्ही तालुक्यातील शेतीची उत्पादकता वाढावी व शेतकऱ्यांना अधिकचे आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता प्रयत्न करीत आहेत.
दुसरीकडे आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार मतदारसंघातील कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपालिकेचे कार्यक्षेत्र असणारी ही दोन्ही शहर स्वच्छ व्हावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत.पहिल्या टप्प्यात दोन्ही शहरातून वाहणाऱ्या नद्या स्वच्छ करण्याचे काम त्यांच्याच पुढाकारातून झालं. नदीकडेला असलेल्या झाडाझुडपांचे अतिक्रमण व साचलेला गाळ हे सर्व काढून नदीच रूप पालटलं. या नद्या वाहत्या झाल्या आणि शहरालगत साचलेले दुर्गंधीचे साम्राज्य पूर्णपणे वाहून गेले.आता शहराच्या मध्यवर्ती असलेले अस्वच्छतेचे साम्राज्य समूळ नष्ट करण्यासाठी सुनंदाताई पवारांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेचे अभियान हाती घेतले आहे. याकरिता शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या प्रभागनिहाय बैठका घेऊन या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी आज जामखेड येथील पत्रकार परिषदेत केले. एकप्रकारे त्यांनी नवरात्रौत्सवात स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे.एकंदरीत रोहित पवार यांच्या राजकीय यशात सुनंदाताई यांचे योगदान मोठे आहे. आमदार पवार हेही ते मान्य करतात. म्हणूनच त्यांनी विधानसभेत शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राने त्यांचे कौतुक केलं होतं.
त्यामुळे आईसाहेब म्हणजेच सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हवा (दादा) सरनोबत व राहुल उद्योग समूहाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.