जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड केली. पण अद्यापही शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान दिलेली नाही तेव्हा आता काही दिवसात खरीप हंगामाची पेरणी सुरू होईल तेव्हा पेरणीसाठी बियाणे, खते घेण्यासाठी शासनाने ताबडतोब पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावेत. तसेच गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे बोगस बियाणे आलेले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती कृषी विभागाने पंचनामे केले होते अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. ती ताबडतोब मिळावी तसेच शासनाने दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना द्यावीत अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांनी केली आहे.
दिड वर्षापुर्वी शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी कर्जफेड केली पण अद्यापही शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलेले नाही. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ताबडतोब पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान ताबडतोब द्यावे त्याचा उपयोग शेतकऱ्यांना बियाणे खते घेण्यासाठी होईल. कारण कोरोनामुळे शेतकरीही अडचणीत आहे.
गेल्या वर्षी अनेक शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले होते सोयाबीन बियाणे उगवलेले नव्हते मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या कृषी विभागाने पंचनामे केले होते पण वर्षे होत आले तरी अद्यापही कृषी विभागाकडून कसलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी मुरूमकर यांनी केली आहे.
शेतीची यांत्रिकीकरण कांदा चाळ यासाठी आॅनलाईन प्रकरणे दाखल केले जातात याचा ड्रॉ राज्य पातळीवर होतो त्यामुळे अनेक तालुक्यातील लोकांवर अन्याय होतो तर काही तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर लाभार्थी असतात त्यामुळे ड्रॉ हा तालुका पातळीवर काढण्यात यावा अशीही मागणी केली आहे. तसेच शेततळे व कागद यासाठी अनुदान द्यावे शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गांभिर्याने विचार करून ताबडतोब शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी केली आहे.