कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर माझ गाव माझी जबाबदारी अभियान – तालुक्यात हिवरे बाजार पॅटर्न राबविण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी केला अ‍ॅक्शन प्लॅन

0
208
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
कोवीड १९ चा प्रादुर्भाव ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर होत असून तिसरी लाट येण्यापूर्वी ग्रामपातळीवर लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, कोरोना चाचणी वाढवणे, लसीकरण होण्यासाठी गावातील पदाधिकारी यांनी मतभेद विसरून एकत्र यावे विविध उपाययोजना राबवाव्या यासाठी
तहसीलदार विशाल नाईकवाडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी माझ गाव माझी जबाबदारी या १० सुत्री कार्यक्रमाचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाठवून साथरोग प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमल बजावणी करण्याचे आवाहन केले आहे.
     जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी तालुक्यात हिवरे बाजार पॅटर्न राबविण्यात येणार आहे त्यानुसार गाव पातळीवर पाच कमिट्या स्थापन करून गावात विविध कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाय योजना केल्या जात आहेत तालुक्यात सध्या ८२६ बाधीत रूग्ण आहेत व आत्तापर्यंत ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोळे कोविड सेंटर व खाजगी हॉस्पिटलमध्ये ९०० च्या आसपास खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे यापुढील काळात आँक्सीजन व खाटांचा तुटवडा होऊ नये म्हणून गावांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी “माझ कुटुंब माझी जबाबदारी” आणि माझ गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून गाव कोरोनामुक्त होण्यासाठी
प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावात बाधीत रूग्णाची संख्या जास्त असेल तर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ ची कठोर अंमलबजावणी करावी, मास्क व सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करावा गाव सोडीयम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुक करावे व लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेचे नियोजन करावे, आरोग्य विभागामार्फत संशयित असलेल्या सर्व कुटुंबाचे व गावात एकही रूग्ण राहता कामा नये यासाठी सर्व्हेक्षण करून कोरोना चाचणी करावी बाधीत रूग्णांना शासकीय कोवीड सेंटरला उपचारासाठी दाखल करावे जे नकार देतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी. बाधीत रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, आरटीपिसीआर चाचणीचा अहवाल येण्यास वेळ लागणार असल्याने त्यांना गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, सर्व सार्वजनिक, खाजगी, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणावे लॉकडाऊनच्या काळात कुठलेच कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घेणे, लसीकरणा बाबत अनावश्यक गर्दी होणार नाही यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, कोरोना काळात शाळा, अंगणवाडी केंद्र बंद असेल तर संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस हे कायम विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील असे नियोजन करावे व तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे.
          गावाच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या या मार्गदर्शक सुचनांचा अंमलबजावणी करावी यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व गटविकास अधिकारी परशुराम कोकणी गावोगावी भेट देऊन महामारी रोखण्यासाठी सर्वतो प्रयत्न करीत आहेत.
     चौकट
तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी तालुक्यात हिवरे बाजार पॅटर्न राबविण्यात येणार आहे त्यासाठी गाव पातळीवर कमिट्या स्थापन करून त्यामार्फत वेगवेगळे कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. कडक आंमलबजावणी करून तालुका कोरोना मुक्त करणार आहोत.
   ( तहसिलदार विशाल नाईकवाडे)
चौकट
  सध्या तालुक्यात आपटी गाव हे कोरोना मुक्त असून दहा गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यात हिवरे बाजार पॅटर्न साठी सरपंच व ग्रामसेवक यांना सांगितले आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने तालुक्यात लोकसहभागातून मंगल कार्यालये ताब्यात घेऊन अद्यावत कोविड सेंटर उभे करणार आहोत.
    (गटविकास अधिकारी परशुराम कोकणी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here