जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला आता समाजाच्या वेगवेगळ्या घटकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. श्रीनिधी मयूर भोसले हिचा दुसरा वाढदिवस होता म्हणजे (चोवीस महिने) यानिमित्त आई वडील व नातेवाईकांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत आरोळे कोविड सेंटरला चोवीस आॅक्सिजन सिलेंडरची मदत केली आहे तसेच तसेच मामा बहिर यांनीही अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली आहे. यामुळे सामाजिक दातृत्वाची जाणीव लहान वयापासूनच भोसले कुटुंबियांनी आपल्या मुलांवर रूजवली आहे.

यावेळी जामखेड कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रावीदादा आरोळे, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी, कृष्णजी(आण्णा) भोसले, सौ. शोभा भोसले, 24 तास रुग्णांची सेवा करणाऱ्या सुलताना शेख, शिऊरचे उपसरपंच विठठल चव्हाण, राष्ट्रवादीच्या संध्याताई सोनवणे, प्राचार्य भगवान मडके, निलेश भोसले, शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, प्रा रमेश बोलभट, अशोक बहिर, डॉ राख,किशोर गायवळ, प्रफुल्ल सोळंकी, बी.एस.शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, संग्राम जाधव, विजय कोळी, संदीप आजबे, हेडकॉन्स्टेबल आरसुल दादा, जाधव मेजर, इंजि, सौरभ उगले, राष्ट्रवादीचे अमोल लोहकरे, आकाश घागरे, प्रशांत दळवी, गणेश जोशी, सौ प्रियांका दाभाडे, सौ सोनाली गायवळ आदी मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल मयुर भोसले यांचे खुपच अभिमानास्पद आहे याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे म्हटले.
कोरोना संसर्ग काळात सामाजिक बांधीलकी जपत वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून याचा उपयोग कोवीड रुग्णासाठी व्हावा आरोळे कोवीड सेंटरला चोवीस मोठे ऑक्सिजन सिलेंडर व दोन क्विंटल ज्वारी श्रीनिधीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत केल्या बद्दल मयुर भोसले व सौ दिपाली भोसले यांचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अभिनंदन करून हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले.व आरोळे कोवीड सेंटरचे संचालक डॉ रावीदादा आरोळे याचे कडे सुपूर्त केले.
अशोक बहिर यांनी आपली भाच्ची श्रीनिधी भोसले च्या वाढदिवसानिमित्त आई वडील मदत करतात आपणही मामा आहोत म्हणून त्यांनीही दोन क्विंटल ज्वारी कोविड सेंटरला मदत केली.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कोरोना काळात ऑक्सिजन अतिशय महत्वाचा घटक आहे, या मदती बद्दल डॉ. रावीदादा आरोळे यांनी मयुर भोसले यांचे आभार मानले व श्रीनिधीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
जामखेडचे तहसिल विशाल नाईकवाडे यांनी मदतीचा उपयोग कोव्हीड रुग्णासाठी होणार आहे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे असे मत व्यक्त केले.
शेवटी मयुर भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.






