जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते चौंडीत २९ विहिर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांना जामखेड तालुक्यात गती मिळाली आहे. जामखेड तालुक्यातील चोंडी गावातील २९ लाभार्थ्यांना विहीरी मंजुर करण्यात आल्या आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते चोंडी गावातील लाभार्थांना मंजुर विहीरींच्या कार्यारंभ आदेशाचे गुरूवारी वाटप करण्यात आले.
जामखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरींच्या कामांना गती मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. जामखेड तालुक्यातील चोंडी गावासाठी सिंचन विहिरींसाठी 1 कोटी 16 लाख रूपये मंजुर झाले आहे. या निधीतून 29 शेतकऱ्यांना वैयक्तीक सिंचन विहीरींचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला 4 लाख रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
गुरूवारी, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या निवासस्थानी चोंडी गावातील 29 लाभार्थ्यांना वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांचे कार्यारंभ आदेशाचे वाटप आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे उपस्थित होते.
यावेळी पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचारणे, अशोक देवकर, आप्पासाहेब उबाळे, राजेंद्र टकले, अक्षय उबाळे, विशाल भांडवलकर, सुदर्शन भोंडवे, रवि शिंदे, दिलीप जगदाळे, अनिल उबाळे, गणेश काळे, अनिल भांडवलकर, अनिल शिंदे, आण्णा भांडवलकर, सुनिल उबाळे, सह आदी उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे चोंडी गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चौकट
जामखेड तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी साठवण्याच्या मोठ्या अडचणी येत आहेत. सिंचन विहीरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. जामखेड तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरींची कामे सुरु झाली आहेत. ही कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. शासनाची लखपती शेतकरी ही योजना या माध्यमांतून यशस्वी होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास ही योजना किफायतशीर ठरणार आहे.
– आमदार प्रा राम शिंदे