जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी सामना करण्यासाठी शासन, व्यक्ती आणि समाज या सर्वांनी सामूहिक प्रयत्न करत लढा देणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील CYDA या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक मँथुव मँट्टम व संचालिका प्रियंका राजेंद्र कोठारी यांच्या पुढाकाराने पुण्यातील येरवडा येथे गोल्फ क्लब परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी खास सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या कोवीड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती मा.ना.निलमताई गोरे , उपमहापौर मा.सुनीता वाडेकर व नगरसेवक मल्हारी साळवे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर कोवीड सेंटर 220 बेडचे असून यात विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष रचना केलेली आहे. या कोवीड केअर सेंटरच्या उभारणी मध्ये सीवायडीए,पीएमसी पुणे ,गीव्ह इंडिया ओकवेन, सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया ,क्विक हील, ऑक्सफॅम आणि सौ. शिला साळवे मेमोरियल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले.
संस्थेच्या संचालिका प्रियंका कोठारी या जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारींच्या कन्या आहेत .कोठारींचा समाज सेवेचा वारसा प्रियंकांनी ही सुरूच ठेवला असून कोरोनाच्या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लढ्यात CYDA ने वैद्यकीय मदत,धान्य, किराणा वाटपासह अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
या उपक्रमाबाबत प्रियंका कोठारी आणि CYDA यांचे जामखेड येथील जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी ,मा सरपंच सुनील कोठारी ,भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अमोल तातेड, प्रफुल्ल सोळंकी, गणेश भळगट ,सुमित चानोदिया, प्रमोद बोगावत ,संजय नहार, अनिल फिरोदिया आदि अभिनंदन केले.