रयत सेवकांतर्फे आरोळे कोविड सेंटरला एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत

0
263
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
अडचणीच्या काळात शिक्षक नेहमीच मदत करतात. कोरोनाच्या संसर्ग काळात जामखेड तालुक्यातील रयतचे प्राचार्य -शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एक लाख  एकावन्न हजार या कोव्हीड मदत  निधी जमा केला याचा  उपयोग गोर- गरीब जनतेसाठी  होणार आहे. असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 62 वी पुण्यतिथी निमित्त मदत निधी संकल्प करून एक लाख एकावन्न हजार रुपये मदत जमा करून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार यांच्या हस्ते डॉक्टर रविदादा आरोळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
   या वेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बोराडे, सुलताना शेख, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी,  जामखेड रयत गट प्रमुख प्राचार्य भगवान मडके, प्राचार्य सोमनाथ उगले, मुख्याध्यापिका चौधरी के. डी, प्राचार्य रमेश वराट, प्राचार्य गरड ए. एस, मुख्याध्यापक कल्याण वायकर, नरसेवक महेश निमोणकर, सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, प्रा.रमेश बोलभट,एनसीसी प्रमुख मयुर भोसले, दिलीप ढवळे, हनुमंत नागरे, सतीश टेकाळे, बी एस शिंदे, तुकाराम लोहार, बापूराव विधाते, प्रा. घुमारे, अमित गंभीर व रयत सेवक उपस्थित होते.
       रयत सेवकांनी जमा केलेले मदतीचा  योग्य उपयोग आरोग्यसेवेसाठी होणार आहे तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी  अभिनंदन करून आभार मानले.
     आरोळे हॉस्पिटल कोव्हीड सेंटरचे संचालक रविदादा आरोळे  यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here