जामखेड न्युज——
दोन हजार माकडांचे पालकत्व घेणारा अवलिया सचिन सोनारीकर
माकडांच्या अन्न पाण्यासाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
सकाळी झोपेतून उठल्यावर दार उघडण्यापूर्वी हजारो माकडे त्यांची वाट पाहत असतात त्या सर्व माकडांचा सांभाळ गेल्या आठ वर्षापासून सचिन सोनारीकर करत आहेत ते माकडांसाठी देवदूत बनले आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी मुक्त हस्ते मदत करण्याचे आवाहन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात काळभैरवाचे मोठे मंदिर आहे. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, गोवा या राज्यातून लाखो भाविक भक्ती भावाने दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात माकडांची संख्या मोठी आहे. अनेक माकडांना पुरेसे खायला मिळत नव्हते हि अडचण लक्षात घेऊन सचिन सोनारीकर यांनी माकडांचे पालकत्व स्विकारले आहे. आणि माकडांची खाण्यापिण्याची सोय करत आहेत.
गेल्या सात आठ वर्षापासून सचिन सोनारीकर यांनी सर्व माकडांच्या एक वेळ पोटभर खाद्याची व पिण्याच्या पाण्याची जबाबदारी स्वतः च्या खांद्यावर घेतली आहे. याचा खर्च मोठा आहे. त्यामुळे हे पवित्र काम पुढे जोमाने करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे व सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सचिन सोनारीकर यांनी केले आहे.
सोनारीकर यांचे मंदिरालगत प्रसादिक वस्तूंचे छोटे दुकान आहे. अनेक लोक सामाजिक दातृत्व म्हणून आपले वाढदिवस, लग्न समारंभ निमित्त मदत करतात तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी व सामाजिक संस्थेने उदार अंतःकरणाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.