जामखेड ग्रामपंचायतींसाठी दिवसभरात 443 अर्ज दाखल एकुण 581 अर्ज

0
301
  • जामखेड प्रतिनिधी
    तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी गेल्या पाच दिवसांपासून गाव पुढाऱ्यांची लगबग सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसिल कार्यालयात मोठी गर्दी होती आज दिवसभरात 49 पैकी 39
    ग्रामपंचायतीचे 443 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या शेवटचा दिवस असल्याने आणखी अर्ज दाखल होतील. आज अखेर एकुण 581 अर्ज दाखल झाले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

जामखेड तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. दि. 23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता दि. 24 रोजी पाटोदा दोन, पिंपरखेड दोन, दिघोळ तीन, नान्नज दोन, खर्डा एक असे दहा अर्ज दाखल झाले होते. नंतर सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या होत्या.
आज दिनांक 28 रोजी 128 अर्ज दाखल झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे
धोंडपारगाव 01, गुरेवाडी 02, आपटी 07, आनंदवाडी 05, बांधखडक 04, खुरदैठण 01, चौंडी 07, डोणगाव 02, कवडगाव 01, तरडगाव 03, घोडेगाव 01, नाहुली 03, साकत 12, पाटोदा 09, पिंपरखेड 38, दिघोळ 12, खर्डा 06, नान्नज 06, धामणगाव 08 असे एकुण 128 अर्ज आज दाखल झाले आहेत.
आज दि. 29 रोजी खांडवी 16,बावी 2, कवडगाव 8, डोणगाव 12, नाहुली 9, पिंपळगाव उंडा 14, गुरेवाडी 4,
पिंपखेड 5, धामणगाव 6, दिघोळ 11, बाळगव्हाण 5, आनंदवाडी 5, धोंडपारगाव 6, लोणी 8, कुसडगाव 15, तरडगाव 10, सातेफळ 5, पाटोदा 25, बांधखडक 15, नायगाव 3, तेलंगशी 6, नान्नज 13, पिंपळगाव आळवा 8, अरणगाव 22, मोहा 14, खर्डा 56, साकत 21, जवळके 15, सोनेगाव 7, घोडेगाव 16, बोर्ले 11, चौंडी 17, धानोरा 17, मोहरी 4, सावरगाव 8, पाडळी 10 खुरदैठण 3
चोभेवाडी 4, पोतेवाडी 7 असे एकुण 443 अर्ज दाखल झाले आहेत.

कागदपत्रे गोळा करता करता पॅनल प्रमुख गाव पुढाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही ग्रामपंचायतींसाठी आणखी बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. गाव पातळीवर पक्ष विरहित गटा गटाचे राजकारण आहे. आपल्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायती घेण्यासाठी पुढाऱ्यांची लगबग तसेच अनेकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चौकट
आॅनलाईन प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करताना नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत होता याबाबत अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या होत्या निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी दि. 30 हा एकच दिवस शिल्लक असल्याने निवडणूक आयोगाने दि. 30 रोजी साडेपाच वाजेपर्यंत आॅनलाईनही अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच जात पडताळणी साठीही आॅफलाईन अर्ज दाखल करण्याचा आदेश आला आहे.
असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. अशी माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here