जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी साकत ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी माजी पंचायत समितीचे सभापती व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे जोरदारपणे शक्तीप्रदर्शन करत सर्व अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी साकतचे निवडणूक निर्णय अधिकारी बापुराव माने यांच्या कडे अर्ज दाखल केले यावेळी पॅनल प्रमुख संजय वराट, प्रा. अरूण वराट, डाॅ. सुनील वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, प्रा. भरत लहाने, शहादेव वराट, गणेश वराट, राजू वराट, दत्तात्रय वराट, शिवाजी मुरुमकर, राहुल वराट, सचिन वराट, अविन लहाने, युवराज वराट, सौ. कांताबाई वराट, रंजना वराट, रूपाली वराट, सुरेखा वराट, नानासाहेब लहाने, प्रा. महादेव वराट, भाऊसाहेब लहाने, कैलास लहाने, प्रा. महादेव वराट, राजाभाऊ वराट, शशिकांत वराट, शंकर वराट, विठ्ठल वराट, काशिनाथ पुलवळे, द्वारकादास वराट, कृष्णा पुलवळे, श्रीकांत पुलवळे, बाळू वराट, कैलास वराट यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष साकतच्या ग्रामपंचायतीकडे असते. एकुण 13 जागा आहेत. पाच प्रभाग आहेत यातील प्रभाग दोन कोल्हेवाडी बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. राहिलेल्या चार प्रभागात निवडणूक होणार आहे.