Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद चोंडी शाळेचा होणार कायापालट...

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद चोंडी शाळेचा होणार कायापालट दोन कोटी तीन लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

0
281

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद चोंडी शाळेचा होणार कायापालट

दोन कोटी तीन लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता जामखेड) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२-२३ अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांशी संबंधित १० ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती.तसेच विधीमंडळ सदस्याच्या मागणीच्या अनुषंगाने यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील गाभा समितीने या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली होती.त्यानंतर मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सरकारने (१४३०.२० लक्ष ) चौदा कोटी तीस लक्ष वीस हजार रूपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक चोंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ऐतिहासिक गावांतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे राज्यातून कौतूक होत आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे चोंडी शाळेला भरीव निधी मंजूर झाला आहे. चोंडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यातील खालील 13 ऐतिहासिक गावांमधील शाळा होणार विकसीत

१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चोंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर. (मंजुर निधी – २,०३,४३,०२५/- रूपये)

२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा परिषद शाळा (मुलींची), मोझरी ता. तिवसा, जि. अमरावती (५५,६८,०००/- रूपये)

३) संत गाडगेबाबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंडगांव ता. अंजनगांव सुर्जी जि.अमरावती (४९,६८,०००/- रूपये)

४) शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पापळ, ता. नांदगाव खंडेश्चर, जिल्हा अमरावती (१,७२,०८,००० रूपये)

५) राजर्षी शाहू महाराज जिल्हा परिषद शाळा हिन्दुराव घाडगे विद्या मंदीर. कागल जि. कोल्हापूर (१,११,८६,५४५/- रूपये)

६) वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज जिल्हा परिषद शाळा क्र.१ पिंपळगाव बसवंत, ता. निफाड जि.नाशिक. (१,८५,२८,५७२/- रूपये)

७) महात्मा ज्योतिबा फुले- ज्योती सावीत्री – इंटरनॅशल जिल्हा परिषद शाळा खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे. (१,४६,६२,७७४/- रूपये)

८) महर्षि धोंडो केशव कर्वे जिल्हा परिषद प्राथमिक (मराठी), शाळा मुरूड, जि. रत्नागिरी. (३७,३५,११५/- रूपये)

९) साने गुरूजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालगड ता. दापोली जि. रत्नागिरी (३,३८,३२,२७६/- रूपये)

१०) लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. १, वाटेगांव ता. वाळवा, जि. सांगली. (१,००,०३,६८०/- रूपये)

११) क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, येडे मच्छिंद्र ता. वाळवा, जि. सांगली (५४.४२,४३५/- रूपये)

१२) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर – प्रतापसिंह हायस्कूल सातारा.(१,२५,८७,६८४/- रूपये)

१३) सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद केंदिय प्राथमिक शाळा, नायगांव ता. खंडाळा, जि. सातारा (१,५४,०३, ५६४/- रूपये)

चौकटीसाठी

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांशी संबंधित ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसीत करण्यासाठी शासनाने भरीव निधी मंजुर केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या चोंडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी सरकारने सर्वाधिक निधी मंजुर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सरकारचे मनापासुन आभार”
– आमदार प्रा राम शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!