जामखेड न्युज——
साकेश्वर ज्युनियर काॅलेजचे नीट परीक्षेत दैदिप्यमान यश
साकेश्वर ज्युनियर काॅलेजचा विद्यार्थी आदित्य गणेश अडसूळ नीट परीक्षेत 610 गुण
तालुक्यातील साकत येथील साकेश्वर ज्युनियर काॅलेजचे नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. दहा विद्यार्थ्यांनी 550 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. यात साकत येथील आदित्य गणेश अडसूळ याने नीट परीक्षेत 610 गुण मिळवले आहेत. यामुळे काॅलेजमध्ये आदित्यचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, प्राचार्य पंकज पोकळे, कृष्णा पुलवळे, गणेश अडसूळ, संदीप वराट, अशोक नेमाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री साकेश्वर ज्युनियर काॅलेजने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. काॅलेजचे दरवर्षी बरेच विद्यार्थी मेडिकलला जातात. याही वर्षी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
काॅलेजचे वैशिष्ट्ये
1 | प्रशस्त व हवेशीर इमारत |
2 | निसर्गरम्य परिसर |
3 | निकलाची उज्वल परंपरा, बारावी बोर्ड तसेच नीट परीक्षा |
5 | स्वतंत्र व पुरेशी प्रयोगशाळा |
6 | अद्ययावत संगणक कक्ष |
9 | भव्य क्रीडांगण |
10 | अनुभवी व तज्ञ शिक्षक |
11 | विशेष सराव परीक्षा |