जामखेड न्युज——
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनी ; तपनेश्वर येथे 263 रुग्णांची मोफत तपासणी
बी.पी,शुगर तपासणी सर्व साधारण आजारावर मोफत औषधे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत/ जामखेड एकात्मिक विकास संस्था व भारती आयुर्वेद हाॅस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत/जामखेड मतदार संघातील नागरिकांची मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून आज रोजी सकाळी १०.०० वाजता तपनेश्वर येथे प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक मोहन पवार यांनी केले होते.या शिबीरामध्ये बी.पी,शुगर तपासणी सर्व साधारण आजारावर मोफत औषधे देऊन दिवसभरात 263 रुग्णांना मोफत सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शिवाजी काळदाते,बाबुभाई शेख, विकास नाईक, संतोष हुलगुंडे, दादा गोरे,राजेंद्र लोहार,दिगांबर पवार सर,सादीक सय्यद,अलिम शेख, गणपत बनगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबीरासाठी डॉ.चेतना देवरे, डॉ.अंकूर सिंग यांनी तपासणी केली तसेच स्मिता गुलाठी,तरनूम शेख,प्रियंका पूणेकर,तनुजा ताकवले आदींनी विशेष सहकार्य केले.