जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत शेकडो रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. कोविड सेंटरला दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन आमदार रोहित (दादा) पवार व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज राजुरी ग्रामस्थांनी तीस क्विंटल धान्य आरोळे कोविड सेंटरला दिले.
कार्यसम्राट आमदार रोहित (दादा) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरी व समस्थ ग्रामस्थ राजुरी यांच्या प्रयत्नातून आरोळे हॉस्पिटलला 30 क्विंटल धान्य सुलताना भाभी शेख यांच्याकडे दिले यावेळी सरपंच गणेश कोल्हे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश (दादा) आजबे, सागर कोल्हे, अमोल कोल्हे, अजित कोल्हे, अशोक कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया तालुकाध्यक्ष काकासाहेब कोल्हे, सचिन कोल्हे उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांनी आरोळे कोविड सेंटरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. यामुळे अनेक रूग्णांची सोय झाली आहे तसेच कोविड सेंटरला आॅक्सिजन पुरवठा आमदार पवार हे करत आहे. तसेच आॅक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पन्नास आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन आरोळे कोविड सेंटरला दिल्या आहेत. रूग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार रोहित पवार हे नेहमीच प्रयत्नशील आसतात. रूग्णांना प्रत्येक भेटून किंवा फोनवर आधार देतात.
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश (दादा) आजबे यांनी आरोळे कोविड सेंटरला आतापर्यंत डस्टबीन, मास्क, सॅनिटायझर वाटप केले आहे तसेच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील अनेकांनी रोख रक्कम, अन्नधान्य, किराणा व भाजीपाला आरोळे कोविड सेंटरला दिला आहे. आजबे यांच्या मातोश्री इंदुबाई मुरलीधर आजबे व बंधु चंद्रकांत आजबे यांनी मातृदिनानिमित्त आरोळे कोविड सेंटरला पंचवीस कॅरेट पेरू दिले होते. आजही राजुरी ग्रामस्थांनी तीस क्विंटल धान्य आरोळे कोविड सेंटरला दिले. सुलताना भाभी यांनी आरोळे कोविड सेंटरतर्फे राजुरी ग्रामस्थांचे आभार मानले.