जामखेड न्युज——
जळालेल्या गरोदर स्त्रीला व बाळाला सर्जिकल व अँक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये मिळाले जीवदान
चक्कर येऊन शेगडीवर पडलेली गरोदर महिलेच्या पाठिला मोठी इजा झाली होती तसेच तिला दोन वेळा झटकेही आले होते. नगरला हलवावे लागेल असे अनेक हाँस्पीटलने सांगितले होते. जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये तिला दाखल करून योग्य उपचार करत आई व बाळ दोघांनाही जीवदान देण्यात हाँस्पीटलला यश मिळाले आहे.
शेळगाव येथील वीस वर्षीय गरोदर स्त्री नऊ महीने पूर्ण झालेले होते, स्वयंपाक करताना झटके येऊन शेगडीवर पडली. त्यामुळे तिला पाठिला गंभीर जखम झाली होती. प्रथमोपचार करून तिला जामखेड येथे पाठवण्यात आले पण अनेक हाँस्पीटल मध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला तिला नगरला हलवावे लागेल असे सांगितले तेव्हा तिला जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हाँस्पीटल मध्ये आणले तोपर्यंत तिला दोन झटके आले होते येथील डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी अँडमीट करून घेतले व उपचार सुरू केले यावेळी तिला परत झटका आला त्यामुळे सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जामखेड मधील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना झगडे यांनी तातडीने सिझर करत बाळाला सुखरूप बाहेर काढले. यावेळी भुलतज्ञ म्हणून डॉ. अंकुश पवार, बाळाला काही धोका तर नाही ना म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रताप चौरे यांच्या कडून बाळाची तपासणी करण्यात आली. तेव्हा डॉ. म्हणाले बाळ ठणठणीत व निरोगी आहे.
आई व बाळाला योग्य व वेळेवर उपचार मिळाल्या मुळे बाळाचे व आईचे प्राण वाचले.
आईला व बाळाला डिचार्ज देतेवेळी नातेवाईकांनी सांगितले की, जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हॉस्पिटल मधील डॉ. सचिन टेकाडे, डॉ. सरफराज खान, डॉ. अर्चना झगडे, डॉ. प्रताप चौरे, डॉ. अंकुश पवार यांच्या मुळेच बाळ व बाळाची आई सुखरूप आहेत यांच्या मुळेच जीवदान मिळाले आहे.