जामखेड न्युज——
तालुक्यातील साकत व नायगाव पोटनिवडणुकींचे निकाल जाहीर!!!
साकतमध्ये सुरेखा शहादेव वराट तर नायगाव मध्ये सिंधुबाई विठ्ठल शिंदे विजयी
तालुक्यातील साकत व नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही जागेचे निकाल जाहीर झाले आहेत. साकतमध्ये सुरेखा शहादेव वराट तर नायगाव मध्ये सिंधुबाई विठ्ठल शिंदे विजयी
साकत येथील प्रभाग चार मधील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी असलेल्या जागेवर दोन उमेदवार होते
उमा सदाशिव वराट -37
सुरेखा शहादेव वराट -192
नोटा -4
विजयी उमेदवार सुरेखा शहादेव वराट
नायगाव येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नागरिकांना मागास प्रवर्ग जागेसाठी दोन उमेदवार होते
उगले कांताबाई बाबासाहेब -112
सिंधुताई विठ्ठल शिंदे -294
नोटा -2
विजयी उमेदवार सिंधुताई विठ्ठल शिंदे
अशा प्रकारे काल झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.
साकतचे विजयी उमेदवार सुरेखा शहादेव वराट यांच्या विजयाबद्दल आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व सत्कार केला यावेळी नवनिर्वाचित साकत ग्रा.पं.सदस्य शहादेव वराट यांचा सत्कार करताना कार्यसम्राट आमदार मा.रोहित दादा पवार, समवेत मा.सभापती संजय वराट (सर), जिल्हा सहकारी बँक संचालक अमोल राळेभात, मा.जि.प.सदस्य शहाजी काका राळेभात, उपसरपंच राजाभाऊ वराट, ग्रा.पं.सदस्य महादेव वराट,विठ्ठल वराट, भरत लहाने सर व इतर मान्यवर उपस्थित होते.