खर्डा येथील महिलेचा कुट्टी मशीन मध्ये अडकून मृत्यू परिसरात एकच खळबळ

0
211

जामखेड न्युज——

खर्डा येथील महिलेचा कुट्टी मशीन मध्ये अडकून मृत्यू परिसरात एकच खळबळ

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकरी रामचंद्र रामकिसन इंगोले यांच्या शेतातील गट नंबर ७६ मध्ये कुट्टीमशिन मध्ये अडकून लक्ष्मी विजय गोलेकर (वय ४७) महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


या बाबत सविस्तर असे की, आज दि. १५ मे रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकरी रामचंद्र रामकिसन इंगोले यांच्या खर्डा गावचे शिवारातील गट नं ७६ मधील शेता मध्ये शेतातील कुट्टी व्दारे काम चालू होते.

हे काम सुरू असताना दुपारी साडेबाराच्या वाजताचे सुमारास या घटनेतील मयत लक्ष्मी विजय गोलेकर या आपल्या कामासाठी लागत असलेला कोयता घेण्यासाठी ट्रँक्टरवर चढली व कोयता घेवुन खाली उतरत असताना त्यांची साडी ट्रक्टर वर गुंतली चाका बरोबर महिलेचे
महिलेचे डोके गोल फिरुन गंभीर जखमी झाल्यामुळे तिला ग्रामिण रुग्णालय जामखेड येथे घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले.


यानुसार मुरहरी अंबादास इंगोले (वय ३७वर्ष) रा.खर्डा यांनी दिलेल्या खबरी वरुन खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सभांजी व्ही.शेंडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here