जामखेड न्युज—–
बाजार समिती सभापती व उपसभापती उद्या निवड
सविस्तर निवड कार्यक्रम

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 जागा मिळाल्या आहेत. उद्या सोळा मे रोजी सभापती निवड तारीख निश्चित करण्यात आली आहे. सध्या सर्व सदस्य सहलीवर आहेत उद्या सकाळी जामखेड मध्ये दाखल होतील व सभापती व उपसभापती हे चिठ्ठीद्वारे होणार हे जवळपास निश्चित आहे.

तब्बल अडीच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली यात
कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या आहेत.

कोणत्याही गटाकडे स्पष्ट बहुमत नाही. धोका नको व कोणी फुटू नये म्हणून दोन्ही गटानी आपापले सदस्य सहलीसाठी घेऊन गेलेले आहेत. सध्या तरी चिठ्ठी द्वारेच सभापती व उपसभापती निवडी होतील अशी परिस्थिती आहे.





