जामखेड न्युज——
जामखेडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी
अधिकारी, पदाधिकारी व सर्व पक्षीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा!!
जामखेड शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अधिकारी, पदाधिकारी व सर्व पक्षीय नेत्यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या
जामखेड येथे मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रमजान ईद निमित्ताने जामखेड येथील इदगाह मैदानात रमजान ईद ची नमाज संपन्न झाली या रमजान ईद निमित्त अनेक मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज अदा केली. मौलाना मुफ्ती अफजल, मौलाना खलील कासमी हाफिज समीर च्या वतीने दुवा (प्रार्थना) करण्यात आली. तसेच नमाज अदा केल्यानंतर एकमेकांची गळा भेट झाली.
रमजान ईद च्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधव हे एकत्रित आले व आनंदाने ईद साजरी केली . रमजान हा महिना मुस्लिमांसाठी पवित्र असा महिना समजला जातो या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव महिन्याभराचा उपवास करत असतात नमाज तसेच जकात, फितरा असे अनेक विविध उपक्रम या रमजान महिन्यात राबविले जातात, अनाथ, गरीब कुटुंबांना मदत व्हावी यासाठी जकात व फितरा देणे बंधनकारक असते प्रत्येक मुस्लिम बांधव हा उत्साहाने व आनंदाने रमजान ईद साजरी करतात.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच उपस्थित तहसिलदार योगेश चंद्रे, प्रा. मधुकर आबा राळेभात, डॉ. अँड अरुण जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे, नगरसेवक अमिंत चिंतामणी, बिबिषन धनवडे, डाँ. भास्कर मोरे, अमित जाधव यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शांततेत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली.