Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या कांदा अनुदानासाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मोर्चा

कांदा अनुदानासाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मोर्चा

0
206

जामखेड न्युज——-

कांदा अनुदानासाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मोर्चा

शासकीय नियमानुसार कांदा अनुदान मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे. कांदा विक्रीच्या पट्ट्या व अहवाल मिळण्यासाठी जामखेड बाजार समिती कडून टाळाटाळ होत आहे या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चा साठी परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जहीर ट्रेडर्स व दत्त ट्रेडर्स च्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामखेड  तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे व कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांच्या वतीने शेतकरी बांधवांवर  कांदा अनुदानासाठी होणाऱ्या अन्याय विरोधात तहसिल कार्यलय येथे भव्य मोर्चा चे आयोजन सोमवार दि. 10/4/2023 रोजी जामखेड येथे शेतकऱ्यांच्या पट्ट्यां  व  पट्ट्यांचे  अहवाल घेण्यासाठी जामखेड बाजार समिती टाळाटाळ करत आहेत या कारणास्तव सोमवार दिनांक 10/04/2023 सकाळी नऊ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  केले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे व सहकार्य करावे आपल्या हक्कासाठी  उपस्थित रहावे ही नम्र विनंती जहीर ट्रेडर्स व दत्त ट्रेडर्स तसेच इतर दुकाने यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन व तहसिल येथे निवेदन देण्यात आले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी सोमवार दि. १०/०४/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता जहिर ट्रेडर्स करमाळा रोड चौफुला येथे सर्व शेतकरी बांधवांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित हजर रहावे असे अव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जहिर ट्रेडर्स व दत ट्रेडर्स च्या वतीने करण्यात आले आहे.

तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, संतोष निगुडे( सरपंच आरणगाव), चोंडीचे सरपंच सुनील उबाळे, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, जहीर शेख, बाळासाहेब पवार, गणेश ढगे, संतोष गोरे, अनिल जाधव, कैलास घरत,प्रशांत शिंदे (जवळा सरपंच) आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!