रयत शिक्षण संस्थेचे व शाखेचे नाव देशात उंचावल्याबद्दल उत्तर विभागाच्या वतीने श्री नागेश विद्यालयाचा सन्मान प्राचार्य बी. के. मडके व मयुर भोसले यांचे अभिनंदन करून मेडल सन्मान चिन्ह प्रदान

0
226

जामखेड न्युज——

रयत शिक्षण संस्थेचे व शाखेचे नाव देशात उंचावल्याबद्दल उत्तर विभागाच्या वतीने श्री नागेश विद्यालयाचा सन्मान

प्राचार्य बी. के. मडके व मयूर भोसले यांचे अभिनंदन करून मेडल सन्मान चिन्ह प्रदान

देशात रयत शिक्षण संस्थेचे व शाखेचे नाव उंचावल्याबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय अधिकारी श्री तुकाराम कन्हेरकर यांनी प्राचार्य श्री मडके बी के आणि श्री मयूर भोसले यांचे अभिनंदन करून मेडल सन्मान चिन्ह प्रदान केले.

 

रयतचे नागेश विद्यालय,
जामखेड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये चमकले.

विलक्षण पराक्रम… विलक्षण लोक
विलक्षण फाॅर्मची !इंन्डिया बुक एडीओचे सर्टिफिकेट आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स! हातात! गळ्यात मेडल आणि अभिनंदनाचा वर्षाव ! फक्त शालानुवर्ती नवोपक्रम !

काय केले शाळेने रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालय जामखेड मधील उपक्रमशील मुख्याध्यापक,शिक्षकांनी विद्यालयातील विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स द्वारे प्रजासत्ताक दिनाचे सर्वात मोठे मानवी फॉर्मेशन कॅलिग्राफीची अवाढव्य आकाराची निर्मिती केली.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वात मोठ्या मानवनिर्मिती कॅलिग्राफीचा विक्रम अहमदनगर, महाराष्ट्रातील जामखेड येथील रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या श्री नागेश विद्यालयाने केला आहे.

1000 विद्यार्थी आणि NCC कॅडेट्सच्या चमूने 26 जानेवारी 2023 रोजी शाळेच्या प्रांगणात 10,500 चौरस फूट क्षेत्र व्यापून हातात राष्ट्रध्वज (150 फूट x 70 फूट) घेऊन ‘प्रजासत्तक दिन’ची सुलेखन तयार केली. कलाशिक्षक तथा NCC अधिकारी श्री मयूर कृष्णाजी भोसले), यांचे नियोजन श्री मडके मुख्याध्यापक यांची अभिनव कल्पना !

9 फेब्रुवारी 2023 रोजी पुष्टी केल्याप्रमाणे. रेकॉर्ड्स इंडिया India book of records ने
तारीख: 21 फेब्रुवारी 2023 रोजी
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची नोंदणी भारत सरकारकडे RNI no NARENG/2010/32289 करण्यात आली.

विश्वरूप रॉय चौधरी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ मूक ऑफ रेकॉर्ड्स हे एशिया बुक ऑफ रेकॉर्डशी संलग्न आहे आणि नॅशनल रेकॉर्ड बुक्स मुख्य संपादकांच्या बैठकीत झालेल्या सहमतीने रशियन प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्ड्स (एपीआर) चे पालन करते, म्हणून या विद्यालयाची निवड झाली. आणि भारत सरकारच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली दखल गेली आणि विश्व रेकाॅर्ड नोंद झाली.

26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त
देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील “प्रजासत्ताक दिन” नाव हे साकारणारे पहिले विद्यालय रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड ठरले.

एक हजार विद्यार्थी व एनसीसी कॅडेट हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले
याची लांबी दीडशे फूट, रुंदी 70 फूट असे एकूण 10500 स्क्वेअर फूट मध्ये विद्यालयाच्या मैदानात साकारण्यात आले एनसीसी ऑफिसर तथा कला शिक्षक मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारले आकार दिला आणि विद्यार्थ्यांनी अमृतमहोत्सवी साज चढवला.

नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मडके बी के यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विद्यालयात भव्य “प्रजासत्ताक दिन” प्रमाणबद्ध पद्धतीने साकारण्यात आली.

देशात रयत शिक्षण संस्थेचे व शाखेचे नाव उंचावल्याबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय अधिकारी श्री तुकाराम कन्हेरकर यांनी प्राचार्य श्री मडके बी के आणि श्री मयूर भोसले यांचे अभिनंदन करून मेडल सन्मान चिन्ह प्रदान केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी माननीय श्री तुकाराम कन्हेरकर साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी मा काकासाहेब वाळुंजकर व मा शिवाजीराव तापकीर साहेब , लाईफ मेंबर प्राचार्य श्री सिताराम ढुस, प्राचार्य श्री ढवळे दिलीप, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शिवाजीराव ढाळे, ज्येष्ठ शिक्षक डी एम ढवळे( कन्या विद्यालय), श्री पांडुळे भाऊसाहेब, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील सर्वात मोठे “प्रजासत्ताक दिन” साकारून या स्तुत्य देशभक्तीच्या उपक्रमातून शाखेचे व संस्थेचे नाव देश पातळीवर नेल्याबद्दल विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. असे मनोगत विभागीय अधिकारी श्री तुकाराम कन्हेरकर साहेब यांनी व्यक्त केले.

रयतच्या शैक्षणिक इतिहासात अशा प्रकारच्या अनेक कलाकृती झाल्या आहेत परंतु एखाद्या जागतिक विक्रमाची नोंद व्हावी ही अभिमानास्पद बाब आहे.
प्रशस्त मैदान , राष्ट्रीय सण 26 जानेवारी अमृतमहोत्सव आणि विद्यार्थ्यांनी व्यापलेली सुंदर मानवी रचनात्मक कलाकृती !
हजारांहून अधिक विद्यार्थी एका विशिष्ट सूत्रात बांधलेले,शिस्त व सहभाग त्यातून राष्ट्रप्रेमाचा एक धागा बनताना मुलांच्या मनात देशभक्तीची मशाल तेवत ठेवणे ही पण एक मूल्याधिष्ठित शिक्षणाची सामूहिक जबाबदारी आहे.

देशभक्ती कशा व कोणत्या रूपात पुढे येईल सांगता येणार नाही.विशाल रांगोळी काढणे चित्र रेखाटणे तसेच मानवी गुंफून करणे ही पण एक सर्जनेची चुणूक आहे.

प्रयत्नांची पराकाष्ठा करून विक्रम नोंदवणे वेगळे आणि छंदापायी केलेल्या कलेची विक्रमने तुमची नोंद घेणे हे वेगळे !
कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार मा. रोहित दादा पवार यांनी या विशेष कलाकृती बद्दल मुख्याध्यापक व शिक्षकाचे अभिनंदन केले.

शब्दांकन : मा श्री काकासाहेब वाळुंजकर साहेब (र.शि.सं. उत्तर विभाग अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here