खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे शाळेच्या क्रीडांगण विकासासाठी लाखो रुपयांचा निधी जामखेड तालुक्यात 63 लाखाचा निधी, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या चार शाखेसाठी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी

0
141

जामखेड न्युज——

खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे शाळेच्या क्रीडांगण विकासासाठी लाखो रुपयांचा निधी

जामखेड तालुक्यात 63 लाखाचा निधी मंजूर

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या चार शाखेसाठी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी

अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दरवर्षी यंत्रणांना मागणीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. सन 2022-23 या वर्षासाठी 753.52 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यानुसार खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे जामखेड तालुक्यातील नऊ शाळांसाठी 63 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यात दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या चार शाखेसाठी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शाळेतील क्रीडांगणचा विकास होणार आहे.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेडला क्रीडांगण समपातळीत करणे साठी सात लाख रुपये

श्री साकेश्वर विद्यालय साकत क्रीडांगण समपातळीत करणे साठी सात लाख रुपये

न्यू इंग्लिश स्कूल राजुरी क्रीडांगण समपातळीत करणे साठी सात लाख रुपये

श्री.भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हळगाव क्रीडांगणास भींतीचे कुंपन घालणे सात लाख रुपये

 दि, पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाखाला निधी मंजूर झाल्यामुळे  संस्थेच्या वतीने खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या चार शाखासह तालुक्यातील इतर पाच शाळांनाही प्रत्येकी सात लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात 63 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 

महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. जिवायो-1007/प्र.क्र.39/का. 1444, दि. 16.02.2008 अन्वये सुधारीत कार्यप्रणालीनुसार
जिल्हाधिकारी यांना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने संदर्भात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार दिले आहेत. या प्रदान केलेल्या
अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, अहमदनगर यांनी 2022-2023 या आर्थिक वर्षाकरीता लेखाशिर्ष- क्रीडांगणाचा विकास, 22045297 31 सहायक अनुदाने (वेतनेतर). या योजनेतून, जिल्हा क्रिडा अधिकारी, अहमदनगर यांनी संदर्भिय पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावातील खालील योजनेतील समाविष्ट कामे / बाबींना नमुद केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

उपरोक्त् संदर्भ ना. 1 अन्वये कार्यान्वयीन यंत्रणेने सादर केलेल्या प्रस्तावास संदर्भ क्र. 3 च्या तांत्रिक मान्यतेच्या आधीन राहून प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरण करण्यात येत आहे.

निधी मुळे चारही शाखांच्या क्रीडांगणाचा विकास होणार आहे. जिल्हा नियोजन मध्ये खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे दि, पिंपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड, श्री साकेश्वर विद्यालय साकत, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी व श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव या शाळांना निधी प्राप्त झाला आहे. यासह इतर पाच शाळांना निधी मंजूर झालेला आहे. 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here