जामखेड शहरातील गुंडगिरी, खंडणी बहाद्दराविरोधात सामान्य जनता रस्त्यावर तहसील कार्यालयावर उद्या विराट मोर्चा

0
163

जामखेड न्युज——
जामखेड शहरातील गुंडगिरी, खंडणी बहाद्दराविरोधात सामान्य जनता रस्त्यावर

तहसील कार्यालयावर उद्या विराट मोर्चा

गेले तीन वर्षे शांत असणारे जामखेड पुन्हा दहशतीच्या सावटाखाली येत आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली आहे. शहरात लहान मोठ्या गुंडांचे मोठ मोठे बॅनर्स झळकत आहेत. अनेक गावगुंड राजरोसपणे खंडणी मागतात अनेकांकडे विना परवाना हत्यारे आहेत याचा धाक दाखवतात व दहशत पसरवितात यामुळे शांत जामखेड पुन्हा दहशतीच्या सावटाखाली येत आहे याचा निषेध करण्यासाठी कलाकेंद्र चालक, कलाकार व शहरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने उद्या विराट मोर्चाचे आयोजन केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील सर्व जनतेला कळविण्यात येते की शहरांमधील गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुर, लोककलावंत, अंध-अपंग व महिला यांच्यावरती अलीकडच्या काळात मोठा प्रमाणात अन्याय, अत्याचार,शोषण, पिळवणूक केली जात आहे, त्याचबरोबर जामखेड शहरातील गावगुंडांनी टोळ्या तयार करून धमकी देऊन दहशत निर्माण करणे,खंडणी मागणे,गोर गरीब महिलांवरती जबरी अत्याचार करणे, असे प्रकार दिवसां-दिवस वाढत चालले आहेत.

असाच एक प्रकार दि-21 मार्च 2023 रोजी रात्री जामखेड शहरातील कलाकेंद्रवर 20 मुलांचा टोळीने हातात शस्त्र घेऊन महिलांना मारहाण व त्यांची छेडछाड करण्यात आली व त्यांना धमकी देऊन खंडणी द्या नाहीतर कलाकेद्र चालु देणार,असे म्हणुन जबरी मारहाण करून तेथील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच पैसे व मैल्यवान वस्तू चोरी केल्या, अशाप्रकारे दहशत निर्माण करुन तीन कलाकेद्रवरची सर्व मोडतोड देखील केली आहे त्यामुळे आता जवळपास 300 कलाकार मंडळी दहशतीच्या छायेखाली आहे,या सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी जामखेड तहसीलदार कार्यालयावरती निषेध मोर्चाचे आयोजन केला आहे.

तरी दि-24 मार्च 2023 रोजी सकाळी ठिक 10:30 वाजता जामखेड एसटी बस स्थानकावरुन निघेल या मोर्चात प्रा. मधुकर (आबा) राळेभात, अझहर काझी, सचिन भाऊ जाधव अहमदनगर, राजेंद्र कोठारी, दत्ताभाऊ वारे, अभिजीत काळे,अँड डॉ.अरुण (आबा)जाधव, अजय (दादा) काशीद, सुर्यकांत मोरे, आमित चिंतामणी, डॉ.भास्कर मोरे, पांडुराजे भोसले, रमेश (दादा) आजबे, अमित जाधव,गुलशन अंधारे, प्रदिप टापरे प्रा. विकी घायतडक, विकी (भाऊ) सदाफुले, बापुसाहेब गायकवाड, बापुसाहेब ओव्होळ,बबन तुपेरे,नरेंद्र जाधव,पवन डावकर,समीर चंदन,अतिश पारवे,सनी सदाफुले सह अनेक मान्यवर या आंदोलनात सहभागी होणार आहेत कृपया जामखेड शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व पक्ष, संघटना, व्यापारी, उद्योजक, या सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे हि नम्र विनंती अरूण जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here