जामखेड न्युज——
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांपासून साकारलेल्या प्रजासत्ताक दिन नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
भारत सरकार संचलित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय विद्यार्थ्यांपासून साकारलेले प्रजासत्ताक दिन या नावाचे देशातील सर्वात मोठे मानवी अक्षर अशी नोंद घेतली आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून अशी माहिती प्राप्त झाले असून त्या संदर्भातले सुवर्ण मेडल प्रमाणपत्र इंडिया बुक चे पुस्तक पार्सल मिळाले आहे. या मुळे जामखेडच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे.
या विश्वविक्रम मेडल प्रमाणपत्र वितरण समारंभ दि 21 मार्च 2023 रोजी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता श्री नागेश विद्यालयात संपन्न होणार आहे.
तरी शाळा प्रशासनाच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.