जुन्या पेन्शनसाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन
जोपर्यंत तुम्ही पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आज चौथ्या दिवशी तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर थाळीनाद व घोषणांनी दणाणून गेला होता.
यामाध्यमातून सरकारला जागे करण्याचे काम आम्ही करू व सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप असाच चालू ठेऊ, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एक वीस सदस्य कमिटी स्थापना केली आणी यानुसार दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचे निश्चित केले.
जामखेड तालुका कर्मचारी कृती समिती तालुका कार्यकारणी ————————————————
१) युवराज (दादा) गोकुळ पाटील – अध्यक्ष २) ज्ञानेश्वर रामभाऊ कोळेकर – सचिव ३) बापूराव किसन माने – मानद अध्यक्ष ४) अविनाश खंडेराव नवसरे – कार्याध्यक्ष ५) सुखदेव कल्याण कारंडे – कार्याध्यक्ष ६) प्रशांत दशरथ सातपुते – उपाध्यक्ष ७) रामहरी राजेंद्र बांगर – उपाध्यक्ष ८) पी.टी.गायकवाड – कोषाध्यक्ष ९) ज्योती साहेबराव पवार – कोषाध्यक्ष १०) किशोर शिवाजीराव बोराडे – संघटक ११) विजयराज सुभाष जाधव – संघटक १२) राजन बाबासाहेब समिंदर – संघटक १३) सुरज दिलावर मुंडे – सहसचिव १४) शारदा वसंतराव कुटे – सहसचिव १५) शोभा चांदोबा कांबळे – सल्लागार १६) शिल्पा साखरे – सल्लागार १७) सुदाम वराट – प्रसिद्धी प्रमुख १८) नितीन शिंदे – प्रसिद्धीप्रमुख १९) प्रशांत जाधव – सन्मा. सदस्य २०) रमेश मिठू बोलभट – सन्मा. सदस्य २१) सुरेश आत्माराम हजारे – सन्मा. सदस्य २२) अझरुद्दीन सय्यद – सन्मा. सदस्य २३) उमाकांत कुलकर्णी – सन्मा. सदस्य २४) हनुमंत गंगाराम खाशेटे – सन्मा. सदस्य २५) संतोष छत्रभुज भोंडवे – सन्मा. सदस्य २६) रंगनाथ विश्वनाथ जगधने – सन्मा. सदस्य
संपामध्ये शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, मुख्याध्यापक संघ, उच्च माध्यमिक, हिवताप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सह अनेक विभागातील कर्मचारी संपावर आहेत. आज संपाच्या चौथ्या दिवशी सर्व कर्मचारी तहसील कार्यालयात जमले. थाळीनाद आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध करत पेन्शनची मागणी केली. सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.